हर्षवर्धन प्रशिक्षणानंतर पदभार स्वीकारणार होते
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटकातील तरुण आयपीएस अधिकारी हर्षवर्धन हे हसन जिल्ह्यात पहिली पोस्टिंग घेण्यासाठी जात होते. यादरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात आयपीएस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.
26 वर्षीय हर्षवर्धन यांनी नुकतेच त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. हर्षवर्धन हे मूळचे मध्य प्रदेशचे होते आणि कर्नाटक केडरचे 2023 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरावर आणि झाडावर आदळले. हर्षवर्धन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चालक किरकोळ जखमी झाला.
IPS officer on his first posting dies in road accident
महत्वाच्या बातम्या
- Sadabhau Khot सदाभाऊ खोतांचा बाबा आढावांना सवाल- मुस्लिमबहुल भागात महायुतीला कमी मते मिळतात, तिथे EVM मविआसाठीच कसे सेट होते?
- Manoj Jarange : भाजप महायुतीला कौल देऊन जनतेने दाखवली सत्तेची दिशा; पण जरांगेंची सरकारच्या मुंडक्यावर पाय द्यायची भाषा!!
- Haryana government गायी पाळणाऱ्यांना ‘हे’ सरकार देत आहे 30 हजार रुपये
- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांवरील हल्ल्याच्या घटनेवर भाजपचा मोठा दावा!