• Download App
    सर्वांत महागडा खेळाडू कोण?, कोणी कोणाला विकत घेतले?, कोण राहिले UNSOLD?; वाचा यादी IPL2023Auction: Who is the most expensive player?

    IPL2023Auction : सर्वांत महागडा खेळाडू कोण?, कोणी कोणाला विकत घेतले?, कोण राहिले UNSOLD?; वाचा यादी

    वृत्तसंस्था

    मुंबई : IPL २०२३ या आगामी हंगामासाठी सध्या कोची येथे मिनी लिलावात इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करनवर तब्बल १८.५० कोटींची बोली लावत त्याला पंजाब किंग्सने (PBKS) विकत घेतले. याआधी IPL च्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस हा सर्वात महागडा वेगवान खेळाडू ठरला होता. राजस्थान रॉयल्सने त्याला २०२१ मध्ये १६.२५ कोटींना खरेदी केले होते परंतु यंदा ख्रिस मॉरिसचा हा विक्रम सॅम करनने मोडीत काढला आहे. IPL2023Auction: Who is the most expensive player?

    सॅम करनवर यंदा अनेक फ्रॅंचायझींची नजर होती. त्याचा जुना संघ चेन्नई आणि पंजाब यांच्यात त्याला विकत घेण्यासाठी लढाई होती परंतु अखेर पंजाबने सॅमला १८.५० कोटींना विकत घेतले.

    चेन्नईने भविष्यातील कर्णधार म्हणून बेन स्टोक्सला १६.२५ कोटींना विकत घेतले. फलंदाजी आणि गोलंदाजीसोबत तो एक चांगला कर्णधार सुद्धा आहे. स्टोक्स हा राजस्थान रॉयल्समध्ये अनेक वर्ष सहभागी होता. परंतु आता २०२३ साठी चेन्नई संघाकडून स्टोक्स खेळेल.

    मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनला विकत घेत त्याचा संघात समावेश केला आहे. सॅमनंतर ग्रीन सर्वात महागडा खेळाडू ठरला त्याच्यावर १७.५० कोटींची बोली लागली.

    इंग्लंडच्या खेळाडूंना मागणी

    यंदाच्या हंगामात इंग्लंडच्या खेळाडूंना लिलावात विशेष मागणी आली. सॅम करन, बेन स्टोक्स यांना मिळालेल्या रेकॉर्ड ब्रेक बोलीनंतर युवा खेळाडू हॅरी ब्रुकलाही १३.२५ कोटींना सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले.

    अजिंक्य रहाणेच्या पदरी निराशा; हे खेळाडू राहिले UNSOLD

    IPL २०२३ च्या लिलावात युवा तसेच इंग्लंडच्या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागली. परंतु, मुंबईकर खेळाडू अजिंक्य रहाणेच्या पदरी यंदा निराशा आली. अजिंक्य रहाणेला चेन्नई सुपरकिंग्सने फक्त ५० लाखांना विकत घेतले.

    IPL २०२३ मध्ये हे खेळाडू राहिले UNSOLD

    जो रूट, Rilee Rossouw ,  शकिब अल हसन, लिटन दास, कुसल मेंडिस,  टॉम बॅंटन,  ख्रिस जॉर्डन, अॅडम मिलने, अकेल होसीन, अॅडम झाम्पा, तबरेझ शम्सी, मुजीब रहमान, अनमोलप्रीत सिंग, चेतन एलआर, शुभम खजुरिया, रोहन कुन्नम्मल, हिम्मत सिंग, प्रियम गर्ग, सौरभ कुमार, कॉर्बिन बॉश, अभिमन्यू ईश्वरन, शशांक सिंग, सुमित कुमार, दिनेश बाणा, मोहम्मद अझरुद्दीन, केएम आसिफ, मुजतबा युसूफ, लान्स मॉरिस, चिंतन गांधी, इझारुलहुक नावेद,  मुरुगन अश्विन, श्रेयस गोपाळ, एस मिधुन, पॉल स्टर्लिंग,  Rassie व्हॅन डर Dussen, शेरफेन रदरफोर्ड, ट्रॅव्हिस हेड, मनदीप सिंग, दाऊद मालन, डॅरिल मिशेल, मोहम्मद नबी, वेन पारनेल, जिमी नीशम, दसुन शनाका, रिले मृडिथ, संदीप शर्मा, तस्किन अहमद,  दुष्मंथा चमीरा,  आशीर्वाद मुजरबानी

    IPL2023Auction: Who is the most expensive player?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!