- इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असलेलं आयपीएल आजपासून सुरू झालं आहे. या निमित्ताने हॉटस्टारवर लाईव्ह क्रिकेट कॉमेंट्री आपल्या मराठी भाषेत ऐकायला मिळणार आहे!
- डिज्नी प्लस हॉटस्टारवर ऑडिओ फीडमध्ये मराठी भाषा निवडा आणि आजचा आयपीएलचा पहिला सामन्यात मराठी समालोचनाचा आनंद घेत पहा.
- आयपीएल २०२१ चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यामध्ये होणार आहे. आज ९ एप्रिल संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना सुरू होईल.
विशेष प्रतिनिधी
चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये होणार आहे. प्रेक्षकांना हे सामने घरी टीव्हीवर live पाहावे लागतील.IPL 2021: Hey … now commentary in Marathi!
या स्पर्धेचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने १४व्या हंगामासाठी समालोचकांची मोठी टीम जाहीर केली आहे. जवळपास दोन महिने चालणाऱ्या या स्पर्धेचे समालोचन इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ, मळ्याळम, तेलगू आणि बंगाली भाषेत केले जाणार आहे.
यासाठी स्टारने माजी खेळाडूंचा समावेश असलेल्या १०० जणांची टीम जाहीर केली आहे. यात जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेटपटू आहेत.
या मराठी कॉमेंट्रीसाठी क्रिकेटपटू विनोद कांबळी, संदीप पाटील, अमोल मुजुमदार, स्नेहल प्रधान, कुणाल दाते, प्रसन्न संत आणि चैतन्य संत यांचा समावेश करण्यात आला आहे.
यामधील बरेच जण स्वतः आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असल्याने त्यांचा अनुभव प्रेक्षकांना सामना पाहत असताना विविध अंगी विश्लेषण रूपात ऐकायला नक्कीच आवडणार आहे.
स्टार स्पोर्ट्सने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार Star Sports Marathi नावाच्या वाहिनीवरून टीव्हीवर मराठी समालोचन पाहू शकता. मात्र ही वाहिनी जवळपास कोणत्याही प्रमुख डीटीएच ऑपरेटरकडे उपलब्ध झालेली दिसत नाही. त्यामुळे सध्यातरी मराठी समालोचन टीव्हीवर उपलब्ध नसेल. त्यासाठी इंटरनेट आधारित टीव्ही/फायर टीव्ही सारखे स्ट्रीमिंग उपकरण असेल तर त्याद्वारे हॉटस्टारवर हे समालोचन मराठीत ऐकता येईल.
डिस्ने हॉटस्टारवर भारतातील अन्य भाषांमध्ये आयपीएलचे समालोचन केले जाते. यामुळे मराठीतूनही समालोचन केले जावे, यासाठी मनसेने आता थेट डिस्ने हॉटस्टार कंपनीला ऑक्टोबर २०२०मध्ये पत्र पाठवले होते.
IPL 2021: Hey … now commentary in Marathi!