वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार आणि राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी उपराष्ट्रपतींच्या सरकारी निवासस्थानी जाऊन त्यांना श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. Invitation to Vice President to Ayodhya
आपण अयोध्येमध्ये जरूर येणार. आधी वेळ कळवून आपल्या तिन्ही पुत्रांसह आणि परिवारासह श्री रामलल्लांचे दर्शन घेणार, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले. देशाच्या इतिहासात गौरव पूर्ण ठरणारा हा क्षण आहे. राज्यघटनाकारांनी देखील राज्यघटनेमध्ये श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांची चित्रे समाविष्ट करून रामराज्याचीच संकल्पना मांडली होती. श्रीराम हे या देशाचे अधिष्ठान आहेत हेच त्या दूरदर्शी घटनाकारांनी त्यावेळी अधोरेखित केले होते, याकडे उपराष्ट्रपतींनी लक्ष वेधले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत 22 जानेवारी रोजी श्रीराम लल्लांची अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे. या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींना रामजन्मभूमी ट्रस्टने निमंत्रण दिले आणि उपराष्ट्रपतींनी त्यांना आपण आधी वेळ कळवून अयोध्येला श्री रामलल्लांच्या दर्शनाला येणार असल्याचे स्पष्ट सांगितले.
Invitation to Vice President to Ayodhya
महत्वाच्या बातम्या
- विजय लोकशाहीचा, विजय शिवसेनेचा ; ढोंगी मुखवटा फाटला – श्रीकांत शिंदे
- नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला ‘ED’च्या रडारावर!
- अयोध्येचे निमंत्रण नाकारताना काँग्रेसचे “मुस्लिम फर्स्ट” धोरण; 80 ते 85 % मुस्लिम मते मित्र पक्षांकडे सरकण्याची काँग्रेसला भीती!!
- उद्धव ठाकरेंचे आमदार पात्र ठरवताना विधानसभा अध्यक्षांवर कोणाचा दबाव होता??, मुख्यमंत्र्यांचा सवाल!!