विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : “इंडिया दॅट इज भारत” हा भारतीय राज्यघटनेच्या पहिल्याच कलमात असलेल्या उल्लेखापलीकडे भारताचे स्वाभिमानी पाऊल पडले आहे. भारतात होणाऱ्या प्रतिष्ठेच्या g20 चे निमंत्रण “प्रेसिडेंट ऑफ इंडिया” मध्ये नव्हे, तर “प्रेसिडेंट ऑफ भारत” या नावाने पाठविण्यात आले आहे. Invitation to G20 in the name of “President of bharat”; Congress has a stomach ache
सोशल मीडियावर या महत्वपूर्ण बदलाचे जोरदार स्वागत होत असून स्वाभिमानाचे पाऊल पडते पुढे असे याचे वर्णन अनेकांनी केले आहे. देशाच्या अमृत कालात भारत वेगाने पुढे सरकत असल्याची ग्वाही आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी दिली आहे, तर अमृतकालातला हा बदल देशाच्या इतिहासात माईल स्टोन ठरणारा असेल, असे केंद्रीय मंत्री एस. के. सिंह यांनी ट्विट केले आहे.
मात्र, काँग्रेसला हा बदल रुचलेला नाही. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी याबद्दलचा निषेध करणारे लांबलचक ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत आणि इंडिया यात कितीही भेदभाव करू देत, त्यांनी देशात फूट पाडण्याचे कितीही प्रयत्न करू देत, आमचा भारत मात्र अमृतकालात सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मता पुढे जाईल. भारत युनियन ऑफ इंडिया आहे, असे जयराम रमेश यांनी ट्विट मध्ये नमूद केले आहे.
जयराम रमेश यांनी मोदींच्या नावाने आगपाखड केली असली तरी त्यांनाही आपल्या ट्विटमधून भारत हे नाव वगळता आलेले नाही.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी काँग्रेसच्या या टिपण्णीवरून जोरदार डागले आहे देशाचा सन्मान भारत हे नाव याचा काँग्रेसला एवढा द्वेष का??, असा परखड सवाल नड्डा यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून केला आहे. जेव्हा जेव्हा देशाच्या सन्मानाची बात पुढे येते, त्यावेळी काँग्रेस काहीतरी खुसपट काढते. काँग्रेसला या देशाविषयी सन्मान नाही. संविधानाविषयी सन्मान नाही आणि संविधानिक संस्थांविषयी देखील आस्था नाही. काँग्रेसजनांना फक्त एका परिवाराच्या सन्मानाची चिंता आहे, असा जबरदस्त प्रहार नड्डा यांनी काँग्रेसवर केला आहे.
Invitation to G20 in the name of “President of bharat”; Congress has a stomach ache
महत्वाच्या बातम्या
- एक देश एक निवडणूक ही राष्ट्रहिताची असेल’ प्रशांत किशोर यांनी मोदी सरकारच्या भूमिकेचे केले समर्थन
- सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या उदयनिधीवर ममतांची बोटचेपी भूमिका!!
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला दहिहंडी व सार्वजनिक गणेशोत्सव पूर्वतयारीचा आढावा
- लाठीमाराचे आदेश आम्ही दिल्याचे सिद्ध करा, आम्ही राजकारण सोडू; अन्यथा तुम्ही राजकारण सोडा!!; अजितदादांचे आव्हान