विशेष प्रतिनिधी
मुंबई : शेअर बाजारातील बिग बुल आणि गुंतवणूकगुरू राकेश झुनझुनवाला लवकरच नवीन विमान कंपनी सुरू करणार आहेत. यासाठी ७० विमाने खरेदी करण्याची योजनाही त्यांनी आखली आहे.Investment guru Rakesh Jhunjhanwala to launch new airlines, revolutionize Indian airlines with lowest rates
राकेश झुनझुनवाला यांची पुढील चार वर्षांत ७० विमानांसह नवीन विमान कंपनी सुरू करण्याची इच्छा आहे. भारतात जास्तीत जास्त लोकांनी विमान प्रवास करावा, असे झुनझुनवाला यांना वाटते. त्यामुळेच त्यांनी एव्हिएशन क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखले जाणारे इंडिगो एअरलाईन्सचे माजी अध्यक्ष आदित्य घोष या कंपनीचे सहसंस्थापक म्हणून सोबत घेतले आहे.
झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे आकासा एअरलाईन्स नावानं नवी एअरलाईन्स सुरू करणार आहेत.घोष २०१८ मध्ये इंडिगोमधून बाहेर पडले होते. ते १० वर्षे कंपनीचे अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक म्हणून कार्यरत होते.
पेशाने वकील असलेले घोष २००८ मध्ये इंडिगोशी जोडले गेले आणि देशातील सर्वात मोठी एअरलाईन्स कंपनी बनवण्यात त्यांनी मोलाची भूमिका निभावली. घोष यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा इंडिगोच्या ताफ्यात १६० विमानं, १००० पेक्षा अधिक रोज उड्डाणं आमि ५५ हजार कोटी रूपयांचा मार्केट कॅप होता. बुधवारी बाजार बंद होईपर्यंत हे मार्केट कॅप ६४,१६८ कोटी रूपयांपर्यंत गेले होते.
घोष यांचा नव्या एअरलाईन्समध्ये १० टक्के हिस्सा असेल. झुनझुनवाला यांच्या नॉमिनीद्वारे ते बोर्ड मेंबरही असतील. परंतु ते मॅनेजमेंटचा भाग नसतील. या एअरलाईन्समध्ये झुनझुनवाला यांचा ४० टक्के हिस्सा असेल. दुबे यांचा १५ टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा असेल.
राकेश झुनझुनवाला म्हणाले की, नवीन विमान कंपनीत जवळपास ३.५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार आहे. या गुंतवणूकीच्या माध्यमातून विमान कंपनीत ४० टक्के हिस्सा घेण्याची योजना आहे. येत्या १५ किंवा २० दिवसांत भारतीय उड्डाण मंत्रालयाकडून एनओसी मिळू शकेल.
भारतामध्ये विमान प्रवास हे अद्यापही श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. त्यामुळे भारतीय विमान सेवा ही जास्तीत जास्त खार्चिक आहे. त्यामुळे झुनझुनवाला यांचे मॉडेल देशातील विमानसेवेत क्रांतीकारी ठरणार आहे.
राकेश झुनझनवाला यांची कंपनी यूएलसीसी म्हणजे अत्यल्प-कमी किमतीच्या मॉडेलनुसार चालणार आहे. यामध्ये प्रत्येक गोष्टीत जास्तीत जास्त कपात केली जाते. विमानात शक्य तितक्या जास्त जागा भरल्या जाणार आहेत. जास्तीत जास्त काळ विमाने उड्डाण करणार आहेत. विमानातील प्रत्येक सेवा ही सशुल्क असणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक उपलब्ध जागेचा वापर जाहिरातींसाठी केला जाईल.
Investment guru Rakesh Jhunjhanwala to launch new airlines, revolutionize Indian airlines with lowest rates
महत्त्वाच्या बातम्या
- अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सेबीने ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड, नियमांचे केले उल्लंघन
- घराणेशाही वाचविण्यासाठीच कॉँग्रेस, शिवसेनेसेह विरोधी पक्ष एकत्र, संबित पात्रा यांचा आरोप
- सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जलवा, ट्विटर अकाऊंट सात कोटी फॉलोअर्स
- टाटा मोटर्स पुढील आठवड्यात वाढविणार मोटारींच्या किंमती, टियोगो, नेक्सॉन, हैरियार आणि सफारी होणार महाग
- बड्या घरचे श्वान शोधण्यासाठी पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा लागली कामाला, पाकिस्तानातील गुजराणवाला येथील प्रकार