- केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांचे सूचक विधान, जाणून घ्या काय म्हणाले?
विशेष प्रतिनिधी
पाटणा : केंद्रीय मंत्री आणि बेगुसरायचे खासदार गिरिराज सिंह यांनी शुक्रवारी बेकायदा मदरशांवरून नितीश सरकारवर जोरदार निशाणा साधला. बिहार सरकारने मदरशांची तातडीने चौकशी करावी, असे ते म्हणाले. तसेच, सीमांचलबाबत ते म्हणाले की, सीमांचलची स्थिती पाहता ना धर्म वाचणार आहे आहे ना संपत्ती असं दिसत आहे.Investigate all Madrasas in Bihar demands Union Minister Giriraj Singh
गिरिराज सिंह यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक व्हिडिओ स्टेटमेंट पोस्ट केले आणि लिहिले की ”बिहार सरकारने मदरशांवर त्वरित बंदी घालावी. सीमांचलची स्थिती पाहिल्यास असे दिसते की ना धर्म वाचणार आहे ना संपत्ती.”
तसेच त्यांनी पुढे लिहिले की, बिहारमध्ये सुमारे 3000 मदरसे आहेत, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि धार्मिक ब्रेनवॉशिंगऐवजी प्रगतीशील शिक्षण दिले पाहिजे. याशिवाय त्यांनी आपल्या व्हिडिओ पोस्टमध्ये म्हटले आहे की, ”पीएफआय सीमा भागात सक्रिय आहे, ज्यामुळे केवळ बिहारच नव्हे तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.”
बिहारच्या शाळांमध्ये नितीश सरकारने रद्द केल्या हिंदू सणांच्या सुट्या, गिरीराज सिंहांची कडाडून टीका
गिरीराज सिंह यांनी असेही सांगितले की , ”मदरशांमध्ये विज्ञानाचा अभ्यास सुरू झाला पाहिजे. मतांसाठीचे लांगुलचालन पुरे झाले, आता जरा बिहार आणि देशाला काय धोका आहे याचा विचार करूया.” ते म्हणाले की, ”जी परिस्थिती निर्माण होत आहे त्यामुळे बिहारमधील लोकांची संपत्ती आणि धर्म येत्या काही दिवसांत धोक्यात येईल, ज्यासाठी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांना जबाबदार धरले जाईल.”
Investigate all Madrasas in Bihar demands Union Minister Giriraj Singh
महत्वाच्या बातम्या
- Madhya Pradesh Exit Poll : मध्य प्रदेशात कोणाचे सरकार? भाजपची कायम राहणार सत्ता! पाहा महानिकालाचा अंदाज
- Rajasthan Exit Poll : राजस्थानात भाजपची सत्ता, जवळपास सर्वच पोलमध्ये काँग्रेसची निराशा
- आता ‘या’ राज्यात पेपरफुटीप्रकरणी जन्मठेप आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंड!
- म्यानमारमधून मिझोराममध्ये पळून आलेल्या आणखी 30 सैनिकांना मायदेशी परत पाठवले