विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सुरक्षेचा भंग करून लोकसभेत घुसलेल्या दोन्ही युवकांना आणि बाहेर एक युवक आणि एका युवतीला पोलिसांनी अटक केली असून दोन युवकांनी लोकसभेच्या गॅलरीतून सभागृहात उडी मारल्यानंतर जो धूर सोडला तो विषारी नव्हता, असे प्राथमिक तपासात आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो कॅन्डल स्मोक असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. Intruding into the Lok Sabha by breaching security
सकाळी प्रश्नोत्तराच्या तासात घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर संसदेचे कामकाज दुपारी दोन नंतर सुरू झाले असून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील प्राथमिक तपासातली माहिती सर्व सदस्यांना दिली.
संसद भवनावर झालेल्या हल्ल्याला आजच २० वर्षे पूर्ण झाली. आजच्याच दिवशी लोकसभेत दोन तरुण शिरले होते. त्यांनी खासदारांच्या बाकांवरुन उड्या मारल्या आणि पिवळ्या रंगाचा धुराचे नळकांडे घेऊन ते आले होते. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविषयी माहिती दिली आहे.
काय म्हटलं आहे पोलिसांनी?
दिल्ली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांनी पिवळ्या रंगाच्या धुराचे कॅन आणले होते. त्या कॅनमध्ये पिवळ्या रंगाचा फ्लोरोसंट धूर होता असेही पोलिसांनी सांगितले आहे. दोन युवक बाहेर होते. तानाशाही नहीं चलेगी, अशा घोषणा देत होते. असेही पोलिसांनी सांगितले. सुरवातीला या दोघांना खासदारांनी पकडले. त्यानंतर त्यांना सुरक्षा प्रेक्षकांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी नंतर या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी या दोघांकडून पिवळ्या रंगाचा गॅस असलेले कॅन ताब्यात घेतले आहेत.
नेमकं काय घडलं?
सगळा गदारोळ पाहून सगळे खासदार सभागृहाबाहेर पडले. ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंतही बाहेर आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी सावंत यांनी सभागृहात घडलेल्या घटनेची माहिती दिली. सावंत म्हणाले, लोकसभेचे कामकाज सुरू असताना अचानक दोनजण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. एका खांबाच्या मदतीने ते खाली प्रेक्षक गॅलरीतून आले. दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते. तेवढ्यात त्यातल्या एकाने बूट काढले, तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरले. त्याचप्रमाणे दुसऱ्यालाही पकडले. त्याचवेळी सभागृहात गॅस पसरू लागला. पिवळ्या रंगाचा गॅस दिसत होता. तो गॅस कसा आला ते माहिती नाही. पण या गॅसमुळे नाकाला आणि डोळ्यांना त्रास होत होता. सुरक्षारक्षकांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतले.
Intruding into the Lok Sabha by breaching security
महत्वाच्या बातम्या
- देशात काँग्रेस असताना वेगळ्या Money Heist फिक्शनची गरजच काय??; पंतप्रधान मोदींचा निशाणा!!
- राज्य मागासवर्ग आयोगातून राजीनामा सत्र; पण ताबडतोब नव्या नियुक्त्या; अध्यक्षपदी न्या. सुनील शुक्रे; तीन सदस्यही नेमले!!
- पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ल्यात 23 जणांचा मृत्यू, पोलीस स्टेशनची इमारत कोसळली
- ”देशात राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांची आकडेवारी गोळा करणे अशक्य”