• Download App
    आफताबला डेट करणाऱ्या 3 तरुणींची दिल्ली पोलिसांकडून वसईतील पोलीस ठाण्यात चौकशीInterrogation of 3 young women who dated Aftab by Delhi Police at Vasai police station

    आफताबला डेट करणाऱ्या 3 तरुणींची दिल्ली पोलिसांकडून वसईतील पोलीस ठाण्यात चौकशी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली / वसई : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाचा तपास करणारे दिल्ली पोलीस वसईत दाखल झाले आहेत. वसईमध्ये दिल्ली पोलिसांनी आफताब आणि श्रद्धा यांचे शेजारी, मित्रपरिवाराची चौकशी केली आहे. तसेच, डेटिंग ॲपवर आफताबला भेटलेल्या 3 तरुणींची चौकशी दिल्ली पोलिसांनी केली. वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात मंगळवारी ही चौकशी करण्यात आली. Interrogation of 3 young women who dated Aftab by Delhi Police at Vasai police station

    दिल्ली आणि वसई पोलिसांनी या चौकशीबाबत कोणतीही माहिती उघड केली नाही. आफताब पूनावाला डेट करत असलेल्या 4 पैकी 2 तरुणींचा वसई पोलीसांकडून शोध सुरू आहे. तसेच, मंगळवारी चौकशी करण्यात आलेल्या तरुणी या हत्येच्या आधी आणि नंतरही आफताबच्या संपर्कात होत्या. त्याशिवाय त्यांच्यात फोनवर संभाषणदेखील झाले असल्याची चर्चा आहे.

    आफताबची नार्को टेस्ट केली जाणार 

    पोलिसांनी श्रद्धाचे मित्र- मैत्रिणी, कार्यालयातले सहकारी, नातेवाईक असे अंदाजे 20 हून अधिक लोकांचे जबाब घेतले आहेत. बहुतेक जणांनी त्यांच्या श्रद्धाशी केलेले चॅट किंवा काॅलबाबतची माहिती आणि पुरावे पोलिसांना दिले आहेत. तर, दुसरीकडे पोलिसांकडून आफताबची नार्को चाचणी करण्यात येणार आहे.

    Interrogation of 3 young women who dated Aftab by Delhi Police at Vasai police station

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे