• Download App
    मणिपूरमधील इंटरनेट बंदी अशंत: उठवली, ब्रॉडबँड सेवा पूर्ववत; मोबाईल इंटरनेटवरील बंदी मात्र तूर्तास कायम! Internet ban lifted in Manipur broadband service restored The ban on mobile internet remains for now

    मणिपूरमधील इंटरनेट बंदी अशंत: उठवली, ब्रॉडबँड सेवा पूर्ववत; मोबाईल इंटरनेटवरील बंदी मात्र तूर्तास कायम!

    (संग्रहित छायाचित्र)

    राज्यातील हिंसाचारामुळे दोन महिन्यांहून अधिक काळ इंटरनेट बंद करण्यात आले होते.

    विशेष प्रतिनिधी

    इंफाळ : मणिपूर सरकारने ब्रॉडबँड सेवेला परवानगी देऊन इंटरनेटवरील निर्बंध अंशत: उठवले आहेत. परंतु मोबाइल इंटरनेटवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. मणिपूर सरकारने ब्रॉडबँड सेवेला सशर्त परवानगी दिली  आहे. Internet ban lifted in Manipur broadband service restored The ban on mobile internet remains for now

    आज दिलेल्या आदेशात राज्य सरकारने म्हटले आहे की, इंटरनेटवरील बंदी लोकांच्या समस्या लक्षात घेऊन अंशतः उठवली जात आहे. कारण त्याचा परिणाम कार्यालये, शैक्षणिक संस्था, आरोग्य सुविधा, स्वयंपाकाचा गॅस बुकिंग आणि इतर ऑनलाइन-आधारित नागरिक-केंद्रित सेवांवर झाला आहे.

    सरकारने आदेशात असेही म्हटले आहे की, ज्यांच्याकडे स्टॅटिक आयपी कनेक्शन आहे तेच मर्यादित पद्धतीने इंटरनेटचा वापर करू शकतात. त्याचबरोबर राज्यात मोबाईल इंटरनेटवरील बंदी कायम राहणार आहे. राज्यातील मैतेई आणि कुकी समुदायांमधील जातीय संघर्षानंतर दोन महिन्यांहून अधिक काळ इंटरनेट बंद करण्यात आले होते. 3 मे पासून मणिपूरमध्ये हिंसाचारामुळे 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

    Internet ban lifted in Manipur broadband service restored The ban on mobile internet remains for now

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी