• Download App
    आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू, येत्या २७ मार्चपासून उड्डाणे; दोन वर्षांनंतर पूर्ववत सुरु|International flights resume from March 27; Undo after two years

    आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू, येत्या २७ मार्चपासून उड्डाणे; दोन वर्षांनंतर पूर्ववत सुरु

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू होत आहे. येत्या २७ मार्चपासून उड्डाणे सुरु होणार आहेत. दोन वर्षांनंतर ही सेवा बहाल केल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.International flights resume from March 27; Undo after two years

    नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे की, आम्ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करत आहोत. मात्र केंद्रीय आरोग्य विभागाने लादलेल्या नियमांचे सर्वांना पालन करणे बंधनकारक असणार आहे. कोरोनामुळे २०२१ पासून एअर बबल प्रणाली अंतर्गत उड्डाणे चालवली जात होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी केंद्राने आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता.



    दोन वर्षांनंतर सेवा पूर्वरत

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आंतरराष्ट्रीय उड्डाणाला बंदी घालण्यात आली होती. दोन वर्षानंतर निर्बंध हटवण्यात आले आहे. आतंरराष्ट्रीय विमानसेवा आता २७ मार्चपासून सुरू होणार आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता २३ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर भारताने जुलैमध्ये एअर बबल प्रणालीच्या माध्यमातून ४५ देशांमध्ये विशेष प्रवासी विमाने चालवण्यात आली होती.

    International flights resume from March 27; Undo after two years

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही