• Download App
    International flights already banned: सिंगापूर-भारत दरम्यान ३० एप्रिल पासून बंद असलेली विमान सेवा बंद करण्याची अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारकडे मागणी International flights already banned: Arvind Kejriwal demands closure of Singapore-India flights

    International flights already banned:सिंगापूर-भारत दरम्यान ३० एप्रिल पासून बंद असलेली विमान सेवा बंद करण्याची अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारकडे मागणी

    • कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे ३० एप्रिल रोजी केंद्र सरकारने ३१ मे पर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे.International flights already banned: Arvind Kejriwal demands closure of Singapore-India flights

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार सुरू आहे. याच दरम्यान वैज्ञानिकांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी सिंगापूर येथून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. सिंगापूर येथे आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दल केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली आहे. हा स्ट्रेन लहान मुलांसाठी धोकादायक असल्यामुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने ३० एप्रिल रोजीच आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

    केजरीवाल यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत प्रामुख्याने काम करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

    सिंगापूरमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन विषाणू लहान मुलांसाठी धोकादायक मानला जात आहे. हा तिसऱ्या लाटेच्या रुपात भारतात येऊ शकतो. माझी केंद्र सरकारला विनंती आहे. सिंगापूरसोबत सुरु असलेली विमान सेवा तात्काळ बंद करावी. लहान मुलांच्या लसीकरणासाठीसुद्धा प्रामुख्याने काम करण्यात यावे, असे केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

    नेटकर्यांनी केजरीवाल यांच्या ट्विट नंतर त्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे .

    लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट ही धोकादायक असल्याचे वैज्ञानिकांकडून सांगण्यात आल्यामुळेच केजरीवाल यांनी लहान मुलांच्या देखील लसीकरणासाठी काम करण्याची विनंती केली आहे

    International flights already banned: Arvind Kejriwal demands closure of Singapore-India flights

    Related posts

    IPL 2025 : आयपीएल २०२५चे नवीन वेळापत्रक जाहीर, १७ मे पासून सामना सुरू होणार

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात पुन्हा ड्रोन दिसले; होशियारपूरमध्ये 5-7 स्फोट, ब्लॅकआऊट

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!