crude oil price : ज्यांना पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी ही वाईट बातमी आहे. जागतिक बाजारपेठेत गेल्या 5 दिवसांपासून वेगाने वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमती पाहता देशांतर्गत बाजारात इंधन तेलाच्या किमती कमी होण्यास खूप कमी वाव आहे. कारण किंमत कमी होण्याचे सोडा उलट आता वाढीचीच चिन्हे जास्त आहेत. 2018 नंतर सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमती उच्चांकी होत्या. वाढीचा हा दर पाहिला तर त्या लवकरच 80 डॉलर प्रति बॅरलच्या पातळीला स्पर्श करतील. International crude oil price on High since last years, petrol and diesel prices may rise More
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ज्यांना पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी ही वाईट बातमी आहे. जागतिक बाजारपेठेत गेल्या 5 दिवसांपासून वेगाने वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमती पाहता देशांतर्गत बाजारात इंधन तेलाच्या किमती कमी होण्यास खूप कमी वाव आहे. कारण किंमत कमी होण्याचे सोडा उलट आता वाढीचीच चिन्हे जास्त आहेत. 2018 नंतर सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमती उच्चांकी होत्या. वाढीचा हा दर पाहिला तर त्या लवकरच 80 डॉलर प्रति बॅरलच्या पातळीला स्पर्श करतील.
कोविडचे लॉकडाऊन संपल्यानंतर आणि विविध ठिकाणी असलेले निर्बंध हटल्यानंतर वाहने मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली आहेत. इंधन तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. म्हणून मागणी वाढली आहे, परंतु तेलाच्या विहिरीतून त्या प्रमाणात कच्चे तेल उत्पादित होत नाहीये. यामुळे मागणी आणि पुरवठा यांच्यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. दरवाढीचे कारण हेच आहे.
दरवाढ सुरूच
रॉयटर्सच्या एका वृत्तात म्हटले आहे की, लंडनमध्ये 0900 तास (GMT) वाजता कच्च्या तेलाची किंमत 79.24 यूएस डॉलर होती आणि त्यात मागील दिवसाच्या तुलनेत सुमारे 1.5 टक्के वाढ झाली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या दरात सतत वाढ होत आहे. अमेरिकेत परिस्थिती कमी -अधिक प्रमाणात सारखीच आहे, तिथे कच्च्या तेलाच्या किमती मागील दिवसाच्या तुलनेत 1.5 टक्क्यांनी वाढून 75.05 डॉलरवर गेल्या. यावर्षी जुलैनंतरचा हा सर्वाधिक दर आहे.
गोल्डमन सॅक्सचा अंदाज काय सांगतो?
गोल्डमॅन सॅक्सचा एक अंदाज सुचवितो की, या वर्षाच्या अखेरीस ब्रेंटची किंमत 90 डॉलरला स्पर्श करू शकते. जगभरात कोरोनाचा डेल्टा संसर्ग कमी झाल्यानंतर दळणवळणात तीव्र वाढ झाली आहे आणि तेलाची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेत नुकत्याच आलेल्या इडा चक्रीवादळाच्या विनाशामुळे तेलाच्या पुरवठ्यावरही गंभीर परिणाम होताना दिसत आहे. गोल्डमॅनने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, मागणी आणि पुरवठ्याचे अंतर अपेक्षेपेक्षा जास्त आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या संसर्गानंतर एवढ्या लवकर रिकव्हरीची कोणी कल्पनाही केली नव्हती. आगामी काळात पुरवठ्यात आणखी घट दिसून येईल.
ओपेकचं म्हणणं काय?
दुसरीकडे, तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने आधीच हात वर केले आहेत. ते म्हणतात की, अशा गंभीर काळात कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवणे हे त्यांच्या सामर्थ्याच्या पलीकडे आहे. ओपेकची ओरड अशी आहे की, तेल विहिरी किंवा पुरवठा पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक कमी झाली आहे आणि इन्फ्रा देखभाल अत्यंत मंद गतीने सुरू आहे. त्यामुळे पुरवठा वाढण्याची शक्यता कमी आहे. मेक्सिकोच्या आखातातही खळबळ उडाली आहे, ज्यामुळे पुरवठ्यात अडचण येत आहे. युरोप आणि अमेरिकन बाजाराची परिस्थिती जवळपास सारखीच आहे.
भारतात काय परिस्थिती?
तेलाच्या किंमतीत वाढ होण्यामागील एक कारण असेही सांगितले जाते की, ज्या प्रकारे जगभरात नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे बाजारात अफवा पसरली होती की लोक आता पर्यायी इंधनाचा अवलंब करू शकतात. या अफवेने तेलावरही परिणाम केला आहे. भारताचा विचार करता गेल्या तीन महिन्यांच्या नोंदींवर नजर टाकली, तर ऑगस्टमध्ये आयात सर्वाधिक वाढली आहे. तेलाची वाढती मागणी पाहता रिफायनर्सनी मोठ्या प्रमाणात तेल साठवल्यामुळे जुलैनंतर आयातीत ही मोठी उडी दिसून आली आहे.
International crude oil price on High since last years, petrol and diesel prices may rise More
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : भारतात सेमीकंडक्टर चिपच्या उत्पादनाची दाट शक्यता, तैवानसोबत 7.5 अब्ज डॉलर्सच्या महाकरारावर चर्चा
- ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे आज आणि उद्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, 11 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी
- भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचे हंगामातील पहिले जेतेपद, Ostrava Open मध्ये चीनच्या झांगसह डबल्स चॅम्पियन
- राजस्थानात हायटेक चिटिंगचा प्रकार उघड, चपलेत बसवले गॅजेट, 25 परीक्षार्थींना दीड कोटीत झाली विक्री, कॉपी बहाद्दरांसह टोळी गजाआड
- सुप्रीम कोर्टाने NEET SS एक्झाम पॅटर्नमध्ये बदल केल्यावरून केंद्र, NBE आणि वैद्यकीय परिषदेला फटकारले