• Download App
    गुप्तचर यंत्रणांचा जवानांना अलर्ट जारी : सैनिक वा त्यांच्या कुटुंबीयांनी चायनीज फोन वापरू नयेत|Intelligence agencies issue alert to soldiers Soldiers or their families should not use Chinese phones

    गुप्तचर यंत्रणांचा जवानांना अलर्ट जारी : सैनिक वा त्यांच्या कुटुंबीयांनी चायनीज फोन वापरू नयेत

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : चीनसोबतच्या LAC सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी एका अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, देशाच्या सैनिकांनी चिनी मोबाईल फोन वापरू नये. सैनिकांच्या कुटुंबीयांनीही चिनी फोन वापरू नयेत. यासाठी सर्व संरक्षण युनिट्सना त्यांच्या जवानांना सावध करण्यास सांगण्यात आले आहे.Intelligence agencies issue alert to soldiers Soldiers or their families should not use Chinese phones

    लष्करी गुप्तचर संस्थांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना सल्ला दिला आहे की त्यांनी भारताच्या शत्रू देशाचे फोन विकत घेऊ नयेत किंवा वापरू नयेत. चिनी कंपन्यांच्या मोबाइल फोनमध्ये मालवेअर आणि स्पायवेअर सापडल्याची प्रकरणे समोर आल्यामुळे ही सूचना जारी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.



    या मोबाइल फोन्सपासून धोका

    गुप्तचर यंत्रणांनी देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो अशा मोबाइल फोनची यादीही दिली आहे. यामध्ये या चिनी कंपन्यांचे फोन समाविष्ट आहेत – Vivo, Oppo, Xiaomi, One Plus, Honor, Realme, ZTE, Gionee, Asus, Infinix इत्यादी फोन्सचा समावेश यादीत आहे.

    चिनी अॅपही हटवले

    यापूर्वी गुप्तचर संस्था चिनी मोबाइल फोन अॅप्लिकेशनच्या विरोधात खूप सक्रिय होत्या. लष्करी जवानांच्या फोनमधून अनेक चिनी अॅप्स काढून टाकण्यात आले. संरक्षण दलांनीही त्यांच्या उपकरणांवर चिनी मोबाइल फोन आणि अॅप्लिकेशन्स वापरणे बंद केले आहे.

    मार्च 2020 पासून भारत आणि चीनमध्ये तणाव आहे. दोन्ही देशांनी पूर्व लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत LAC वर सैन्याचा कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे.

    Intelligence agencies issue alert to soldiers Soldiers or their families should not use Chinese phones

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के