• Download App
    भले बहाद्दर; जोर - बैठका काढा, EVM वर बोंब मारा आणि निवडणुकीच्या मैदानातून पळा; INDI आघाडीला बुद्धिमत्तांची "बौद्धिक" सूचना!! Intellectuals in India has suggested boycotting loksabha elections 2024

    भले बहाद्दर; जोर – बैठका काढा, EVM वर बोंब मारा आणि निवडणुकीच्या मैदानातून पळा; INDI आघाडीला बुद्धिमत्तांची “बौद्धिक” सूचना!!

    नाशिक : संसदेतील गैरवर्तनाबद्दल 142 खासदार निलंबित झाल्यानंतर विरोधकांची आघाडी सैरभैर झाली आहेच, पण त्यापेक्षाही देशातल्या बुद्धिमत्तांची डोकी जास्त फिरली आहेत. त्यामुळेच काही नेत्यांनी आणि बुद्धिमंतांनी INDI आघाडीतल्या नेत्यांना एक “बौद्धिक खुराकी” सूचना केली आहे. तुम्ही लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार जोर – बैठका काढा, पण EVM वर बोंब मारा आणि निवडणुकीच्या मैदानातून आधीच पळा, ही ती “बौद्धिक” सूचना आहे!!

    ही “बौद्धिक” सूचना करण्यात काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील नेते आणि विधानसभेतले माजी विरोधी पक्ष नेते अजय राय यांचा तर समावेश आहेच, पण देशातल्या बुद्धिमंत वर्तुळात स्वतःच्या बौद्धिकतेचा “प्रकाश” पाडणाऱ्या राजू परुळेकरांचाही समावेश आहे. अजय राय आणि राजू परुळेकर यांनीच INDI आघाडीतल्या नेत्यांना लोकसभा निवडणूक 2024 वर बहिष्कार घालण्याची “बौद्धिक खुराकी” सूचना केली आहे.

    मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये ज्या प्रकारे निकाल लागले, ते पाहता लोकसभेच्या निवडणुकीत काय निकाल लागणार आहेत हे आपल्याला माहितीच आहे. जमिनी स्तरावरची हाकिकत वेगळी आहे, पण EVM मशीनद्वारे सत्ताधारी आघाडी जिंकणारच असेल, तर लोकसभेची निवडणूक लढवण्यात मतलब काय?? INDI लोकसभेची निवडणूक आघाडीने लढवूच नये, अशी सूचना अजय राय यांनी केली. त्यांचा तो व्हिडिओ राजू परळेकरांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला आणि त्यानंतर स्वतःचा एक “बौद्धिक” व्हिडिओ देखील शेअर करून INDI आघाडीतल्या घटकांना लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची “आयडियेची बौद्धिक कल्पना” सांगितली!!

    देशात मोदी – शाह हे राज्यघटनेचे राज्य उलटवून सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग संसद यांना आपले अंकित बनवून ठेवलेच आहे, पण लोकसभा निवडणूक त्यांनी जिंकल्यानंतर ते संपूर्ण देशाला हिंदुत्ववादाच्या, ब्राह्मण्यवादाच्या गुलामगिरीत अडकवतील आणि याला सगळे विरोधी पक्ष जबाबदार असतील, असा धमकीवजा इशारा राजू परुळेकरांनी दिला. त्यामुळे जी निवडणूक आपण हरणारच आहोत, ती निवडणूक लढवायचीच कशाला??, त्यापेक्षा निवडणुकीवर बहिष्कार घालून या देशातील लोकशाही वाचवा, असा “बौद्धिक” संदेश राजू परुळेकरांनी आघाडीतल्या नेत्यांना दिला आहे.

    अजय राय किंवा राजू परुळेकर यांची ही “बौद्धिक सूचना” अतिशय “अफलातून” अशीच आहे!!

    आधीच विरोधी आघाडीत उरलेत, ते सगळे घराणेशाही पक्ष आहेत. त्यातही काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष यांच्यातले नाते साप – मुंगसाचे आहे. जे काही उरलेसुरले लोक निवडून येतात आणि सरकारला विरोध करतात, तो विरोधही आता संसद अथवा विधानसभेत उरू नये. मोदी – शाहांच्या भाजपला पुढे चाल द्यावी, अशीच ही बौद्धिक दिवाळखोरीची सूचना आहे!!

    – म्हणे, गुलामगिरीचे सावट

    मोदींनी 2014 मध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिले. 282 जागा जिंकल्या आणि 2019 मध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने 303 जागा जिंकल्या. त्यामुळे “लोकशाही” ताबडतोब “धोक्यात” आली. देशातल्या बुद्धिमत्तांचे अविष्कार स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला. देशात “धर्मनिरपेक्षता” उरली नाही. देशावर हिंदुत्वाचे, हिंदुराष्ट्राचे आणि ब्राह्मण्यवादाचे “गुलामगिरीचे सावट” पसरले, पण त्याआधीच्या 1952, 1957, 1962, 1967, 1971, 1980 आणि 1985 एवढ्या 7 निवडणुकांमध्ये काँग्रेसने 300 ते 350 पेक्षा जास्त जागा मिळवूनही कधीही “लोकशाही” “धोक्यात” आली नाही. बुद्धिमत्तांच्या अविष्कार स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला नाही. देशावर हिंदुत्वाचे, हिंदूराष्ट्राचे किंवा ब्राह्मण्यवादाचे “गुलामगिरीचे सावट” पसरले नाही!!

    मग भले 1952 ते 1985 या 7 निवडणुकांमध्ये एकाच घराण्यातले 3 पंतप्रधान का झाले असेनात… पण देशामध्ये लोकशाही “टिकली” ती “जिवंत” राहिली; नव्हे ती फुलली. तिला पाने – फुले – फळे आली!!, असेच या बुद्धिमत्तांचे “अविष्कार स्वातंत्र्यी” मत आहे!!

    मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान मधला पराभव या बुद्धिमत्तांना डांचला आहे, पण तेलंगण मधला विजय मात्र त्यांना भिंग लावूनही पाहता आलेला नाही.

    वास्तविक 2014 ते 2019 आणि त्यानंतरही देशातल्या प्रत्येक निवडणुकांची आकडेवारी पाहिली आणि त्यांची एकूण टक्केवारी पाहिली तर मोदी – शाहांचा भाजप देशातल्या 50 % निवडणुका हरला आहे. यातली प्रत्येक निवडणूक EVM द्वारेच पार पडली आहे, पण भाजपच्या पराभवाच्या या 50 % कडे बुद्धिमत्तांनी हेतूपुरस्सर लक्ष दिलेले नाही. त्या उलट काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांच्या उरलेल्या 50 % पराभवावर 100 % पराभवाचा शिक्का मारून निवडणुकीच्या रण मैदानातून त्यांनी पळून जावे, अशी भलतीच सूचना देत आहेत!!

    पण लोकसभा निवडणुकीच्या कथित बहिष्कारावरून बुद्धिमत्तांचे काहीही वाकडे होणार नाही. वाकडे होईल, ते काँग्रेसचे आणि प्रादेशिक पक्षांचे आणि घराणेशाही नेत्यांचे!!, की जे त्यांना बिलकुलच परवडणार नाही, मोदी – शाहांचे खरे आव्हान काँग्रेसच्या नेत्यांना आणि प्रादेशिक नेत्यांना पेलायचे आहे. परिणाम भोगायचे आहेत. ते आव्हान या बुद्धिमत्तांना पेलायचे नाही. मग या बुद्धिमत्तांचे ही “बौद्धिक” सूचना काँग्रेस आणि विरोधी INDI आघाडीतले नेते पाळतील का??, हा सवालच आहे…!!

    … की आपला पराभवच होणार आहे, तर निदान त्याची “बौद्धिक” पार्श्वभूमी तरी तयार करून ठेवा, असा “राजकीय पोक्त” विचार राहुलबुद्धीच्या आणि पवारबुद्धीच्या बुद्धिमत्तांनी विरोधी INDI आघाडी पुढे मांडला आहे, हे लवकरच उमजेल!!

    Intellectuals in India has suggested boycotting loksabha elections 2024

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य