• Download App
    न्यायमूर्ती रोहित देवांच्या राजीनाम्यामागे साईबाबा नक्षली कनेक्शनच्या गुप्त रिपोर्टचा संबंध!! Intel inputs on Saibaba case led to judge rohit b deos transfer

    न्यायमूर्ती रोहित देवांच्या राजीनाम्यामागे साईबाबा नक्षली कनेक्शनच्या गुप्त रिपोर्टचा संबंध!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी अचानक राजीनामा दिल्याने वेगवेगळ्या अटकळी बांधल्या जाऊ लागल्या, पण आता त्यांच्या राजीनाम्या मागे नक्षलवादी नेता साईबाबा याच्या सुटकेच्या कनेक्शनचा गुप्तचर खात्याच्या अहवालाचा संबंध असल्याचे समोर आले आहे.  Intel inputs on Saibaba case led to judge rohit b deos transfer

    साईबाबा आणि त्याच्या चार साथीदारांना न्यायमूर्ती रोहित देव यांनी निर्दोष मुक्त केले होते. परंतु सुप्रीम कोर्टाने तो निकाल संपूर्णपणे फिरवला होता. या घटनेनंतर काही दिवसांनी न्यायमूर्ती रोहित देव यांची बदली करण्याचे घाटत होते. पण रोहित देव यांनी ज्या दिवशी राजीनामा दिला त्या आधीच त्यांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठातून अलाहाबाद हायकोर्टात बदली झाली होती आणि या बदलीचा निर्णय गुप्तचर खात्याच्या अहवालाच्या आधारे सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने घेतला होता. या कॉलेजियममध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एस. के. कौल, संजीव खन्ना, बी. आर. गवई, सूर्यकांत हे सहभागी होते.

    गुप्तचर खात्याच्या विशिष्ट अहवालाच्या आधारेच त्यांनी एकूण 23 न्यायमूर्तींच्या बदल्या केला. त्यामध्ये न्यायमूर्ती रोहित देव यांचाही समावेश होता. पण ही बदली स्वीकारण्याच्या ऐवजी रोहित देव यांनी न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला. तशीही त्यांची एकच वर्षाची मुदत उरली होती. ते पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये निवृत्त होणार होते

    नक्षलवादी नेता साईबाबा आणि त्याच्या चार साथीदारांना देशद्रोहाच्या आरोपातून न्यायमूर्ती रोहित देव यांनी 2022 मध्ये निर्दोष मुक्त केले होते. मात्र हा निर्णय सुप्रीम कोर्टाने संपूर्णपणे फिरवला होता आणि त्यांच्यावर युएपीए अर्थात देशद्रोहाचा खटला कायम ठेवला होता. या पार्श्वभूमीवर रोहित देव यांच्या संदर्भातला काही विशिष्ट घटनांच्या कनेक्शनचा अहवाल गुप्तचर विभागाने तयार केला आणि त्यातील विशिष्ट माहितीच्या आधारे सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती रोहित देव यांची बदली केली, पण रोहित देव यांनी बदली स्वीकारण्याऐवजी राजीनामा दिला.

    Intel inputs on Saibaba case led to judge rohit b deos transfer

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- अवमान याचिकेसाठी आमची आवश्यकता नाही; अॅटर्नी जनरलची परवानगी घ्या

    Lucknow High Court : लखनऊ हायकोर्टाने केंद्राला म्हटले- राहुल ब्रिटिश आहेत की नाही, 10 दिवसांत रिपोर्ट द्या!