सीमारेषेवरील विविध भागात चीन नेहमीच घुसखोरीचा प्रयत्न करत असतो, मात्र भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जाते.
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : चीनच्या सीमेजवळ भारतीय लष्कराने आपला पराक्रम दाखवला आहे. ईस्टर्न थिएटरने नॉर्थ ईस्टमधील हाय अल्टिट्यूड आर्टिलरी रेंजमध्ये विशेष सराव केला आहे. चीनच्या डावपेचांना प्रत्युत्तर देण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) उंच आणि दाट टेकड्यांमध्ये हा सराव पूर्ण झाले. Integrated surveillance and firepower training exercise Buland Bharat conducted in High altitude artillery ranges in Eastern command
सीमेवर भारताचा चीनसोबतचा तणाव कायम आहे. एलएसी वरील विविध भागात चीन वेळोवेळी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतो. काही महिन्यांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय जवानांनी तेथून चिनी सैनिकांना पळवून लावले. अशाप्रकारे बुलंद भारत सरावातून भारताला चीनला थेट आणि स्पष्ट संदेश द्यायचा आहे.
अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग आणि तवांग जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आलेल्या विमान वाहतूक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या विशेष दलाच्या संयुक्त विद्यमाने हा सराव म्हणजे आर्टिलरी आणि इन्फंट्रीच्या पाळत ठेवण्याचे आणि अग्निशक्तीचे अचूक प्रात्यक्षिक होते. या विशेष प्रशिक्षणात युद्धभूमीवर शत्रूचा नायनाट करणे, तसेच निवडक लक्ष्यांवर तोफखाना, गन आणि इन्फंट्री फायर सपोर्टसह गोळीबार करणे आदी शिकवण्यात आले.
Integrated surveillance and firepower training exercise Buland Bharat conducted in High altitude artillery ranges in Eastern command
महत्वाच्या बातम्या
- खरा राजकीय स्फोट : राष्ट्रवादी पुरस्कृत सगळ्या वज्रमूठ सभा रद्द??; महाविकास आघाडीच्या एकजुटीत पाचर??
- पवारांच्या निवृत्ती नाट्यातही सर्व काही आलबेल नाही; राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठकीची जयंत पाटलांना माहितीच नाही!!
- PPF Scheme मध्ये पैसे गुंतवले असतील तर तुमचीही लॉटरी लागली समजा, कारण…
- खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत!!