विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राहुल गांधींनी केलेला अपमान या मुद्द्यावर आज सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदारांनी काँग्रेस प्रणित विरोधकांच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे. काल मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या 18 पक्षांच्या बैठकीवर ठाकरे गटाने बहिष्कार घातला होताच. त्याचीच आज पुनरावृत्ती केली आहे. स्वतः संजय राऊत यांनी पत्रकारांना काँग्रेस प्रणित विरोधकांच्या बैठकीवर बहिष्कार घातल्याची माहिती दिली.Insulting Savarkar: Thackeray group boycotts Congress-led opposition meeting today; But Raut – Kharge separate discussion today
पण दरम्यानच्या काळात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार संजय राऊत हे स्वतंत्र भेटणार असल्याच्या देखील बातम्या आल्या आहेत. राहुल गांधींनी इथून पुढच्या काळात राजकारणावर बोलताना सावरकरांचा कोणताही विषय टाळावा यावर दोन्ही नेत्यांच्या बैठकीत भर असणार असल्याचे समजते.
सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुरती कोंडी केली आहे. या राजकीय कोंडीतून सुटण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींना सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा दिला आहे. पण आता त्यापुढे जाऊन शिंदे यांची शिवसेना आणि भाजपने त्यांना नुसता तोंडी अथवा लेखी इशारा देण्यापेक्षा काँग्रेस पासून संबंध तोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांना दिले आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी आणखीन वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खर्गे आणि संजय राऊत यांच्यात राहुल गांधींनी सावरकरांचा विषय राजकीय बोलण्यातून टाळण्याचा विषय चर्चेला येणे अपेक्षित आहे. या दोघांमध्ये या विषयावर चर्चा झाली तरी मल्लिकार्जुन खर्गे हे राहुल गांधींना हा मुद्दा पटवून देतील का?? आणि तो पटवण्याचा प्रयत्न केला तर राहुल गांधी तो मुद्दा पटवून घेऊन खर्गेंचा सल्ला ऐकतील का?? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. किंबहुना त्यावरच उद्धव ठाकरे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत राहतील की बाहेर पडतील??, या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे.
Insulting Savarkar: Thackeray group boycotts Congress-led opposition meeting today; But Raut – Kharge separate discussion today
महत्वाच्या बातम्या
- अभिमानापस्पद! भारतातील पहिले क्लोन वासरू, कर्नालच्या NDRI संस्थेच्या शास्त्रज्ञांची कमाल
- US School Shooting : अमेरिकेतील शाळेत गोळीबार, तीन विद्यार्थ्यांसह सात जणांचा मृत्यू
- भारतीय नारी जगात भारी…! महिला वैमानिकांच्या संख्येत भारत जगात अव्वल
- Amruta Fadnavis bribe blackmail case : ‘बुकी’ अनिल जयसिंघानी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी