वृत्तसंस्था
मुंबई: भारतीय नौदलाला INS विशाखापट्टनमच्या (INS Visakhapatnam) रुपाने आणखी एक अस्त्र मिळणार आहे. प्रोजेक्ट १५ B वर्गातील ही पहिली युद्धनौका आहे. INS विशाखापट्टनम ही स्टेल्थ गाईडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आहे. INS Visakhapatnam to join Indian Navy today
आजपासून ही युद्धनौका सेवेत रुजू होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह INS विशाखापट्टनमच्या जलावतारणाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मुंबईत नेव्हल डॉकयार्डमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. “आयएनएस विशाखापट्टनमच्या जलावतारणासाठी आम्ही सज्ज आहोत. या युद्धनौकेच्या बांधणीत स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. जलावतारणानंतर आणखी काही चाचण्या होतील” असे कॅप्टन बिरेंद्र सिंह यांनी सांगितले. ते INS विशाखापट्टनमचे कमांडिंग अधिकारी आहेत.
या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची समुद्राच्या पृष्ठभागावर आणि पाण्याच्या आत मारा करण्याची क्षमता वाढणार आहे. INS विशाखापट्टनमच्या बांधणीमध्ये स्वदेशी स्टीलचा वापर करण्यात आला आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी ही युद्धनौका सज्ज असेल.
INS Visakhapatnam to join Indian Navy today
महत्त्वाच्या बातम्या
- भावना गवळी यांना ईडीचे तिसरे समन्स, कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी तपास
- आदिवासींच्या धर्मांतराविरुध्द ऑपरेशन घरवापसीचा राजपुत्राचा एल्गार, छत्तीसगडमधील १२०० लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणले
- नवज्योत सिंग सिद्धूंचे पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळले, म्हणाले- इम्रान खान माझे मोठे भाऊ, मला खूप प्रेम दिले!