वृत्तसंस्था
नवी दिल्ली : इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी मंगळवारी म्हटले की, दिल्ली हे सर्वात बेशिस्त शहर आहे. येथील लोक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे येथे येणे गैरसोयीचे आहे. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या (AIMA) स्थापना दिनानिमित्त ते बोलत होते.Infosys founder Narayan Murthy’s criticism: Said – Delhi is the most unruly city, people here do not follow traffic rules
नारायण मूर्ती म्हणाले, दिल्लीत आल्यावर मला खूप गैरसोय होते, कारण या शहरात अनुशासनहीनता सर्वाधिक आहे. हे तुम्ही उदाहरणावरून समजू शकता. काल मी विमानतळावरून येताना सिग्नलवर लाल दिवा असूनही कार, बाईक, स्कूटर वाहतूक नियमांची पायमल्ली करत होते. जर आपण पुढे जाण्यासाठी एक-दोन मिनिटेही थांबू शकत नसू, तर मला सांगा, हे लोक जेव्हा पैसे समोर असतील तेव्हा थांबतील का? अजिबात नाही.
सार्वजनिक संपत्तीचा अधिक चांगला वापर व्हावा
नारायण मूर्ती म्हणाले, सार्वजनिक मालमत्तेचा वापर खाजगी मालमत्तेपेक्षा चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. असे केल्याने सार्वजनिक प्रशासनातील खोटेपणा आणि फसवणूक टाळता येते. देशाने उदारमतवादी भांडवलशाही अंगीकारण्याची गरज आहे. त्याच वेळी, मूर्ती यांनी कॉर्पोरेट जगतात योग्य मूल्ये रुजवण्यावरही भर दिला.
एआय मानवी मेंदूशी स्पर्धा करू शकत नाही
नारायण मूर्ती म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मानवाची जागा घेऊ शकते, असा दावा करणे चुकीचे आहे. मनुष्य हे होऊ देणार नाही, कारण त्याच्याकडे बुद्धीची ताकद आहे.
Infosys founder Narayan Murthy’s criticism: Said – Delhi is the most unruly city, people here do not follow traffic rules
महत्वाच्या बातम्या
- आज दिल्ली महापौरपदाची निवडणूक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मार्ग मोकळा, आतापर्यंत तीन वेळा पुढे ढकलली निवडणूक
- युक्रेन अजूनही स्वतंत्र, रशिया जिंकणार नाही : पोलंडमधून बायडेन यांचे पुतीन यांना प्रत्युत्तर
- उद्धव एपिसोड मधून धडा घेऊन बाकीचे प्रादेशिक घराणेशाही नेतृत्व स्व पक्षांचे लोकशाहीकरण करतील का??
- मुंबई हल्ल्याचे आरोपी पाकिस्तानात मोकाट; जावेद अख्तरांनी लाहोरात जाऊन पाकिस्तानी राज्यकर्त्यांना दाखविला आरसा