विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सलग तिसऱ्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विशिष्ट स्थान हवे असताना त्यांना इतर मित्र पक्षांप्रमाणे राज्यमंत्रीपदाच्या स्वतंत्र कार्यभाराची ऑफर देण्यात आली. परंतु, प्रफुल्ल पटेल यांनी ती ऑफर फेटाळली अशी माहिती देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचे राष्ट्रवादी मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात का नाही??, त्याचे खरे उत्तर दिले फडणवीस यांच्या या उत्तराला प्रफुल्ल पटेलांनी सायंकाळी दुजोरा दिला. informed that our party will get a Minister of State with independent charge
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा मिळणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत खुलासा केला. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत किंवा मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यावं यासाठी राष्ट्रवादीच्याबाबत पडद्यामागे काय-काय घडलं? याचं सविस्तर विश्लेषणच देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेतून अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या एकही जागा मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारच्या वतीने एक जागा ऑफर करण्यात आली होती. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशाप्रकारची जागा त्यांना देण्यात आली होती. पण त्यांचा आग्रह असा होता की, आमच्याकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे. ते आधी मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही. मात्र, आपल्यालादेखील कल्पना आहे की, जेव्हा युतीचं सरकार असतं तेव्हा त्यावेळी काही निकष तयार करायचे असतात. कारण अनेक पक्ष तेव्हा सोबत असतात. त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मला विश्वास आहे, भविष्यात मंत्रिमंडळात विस्तार होईल तेव्हा निश्चितपणे त्यांचा विचार होईल. आताही समावेशाचा प्रयत्न केला गेला. किंबहुना त्यांना आमच्याकडून ऑफर देण्यात आली होती. त्यांनी सांगितलं की, तुम्ही आम्हाला पुढच्यावेळेस दिलं तेव्हा चालेल पण आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच असतो’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जागा मंत्रिमंडळात देण्यात आली होती. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्यांना देण्यात आली होती. त्यांचा आग्रह कॅबिनेट मंत्र्याचा होता. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच असतो. पण त्यांचीदेखील अडचण होती की, कॅबिनेट मंत्रीपदावर राहिलेला माणूस त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारावार आणता येत नव्हता. सरकारचा प्रश्न होता की, युतीत वेगवेगळ्या पक्षांसाठी साधारणपणे एक निकष ठेवावा लागतो. त्यामुळे राष्ट्रवादीने देखील ते मान्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, तुम्ही विस्ताराच्यावेळेला आमचा विचार करा. विस्ताराच्यावेळेला अनेकांचा विचार होईल, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
informed that our party will get a Minister of State with independent charge
महत्वाच्या बातम्या
- Modi 3.0 : माध्यमांमधली पतंगबाजी सोडून सरकार नेमके काय आणि कसे बदलेल??, आर्थिक, सामाजिक अजेंडा कसा असेल??
- मणिपूरमध्ये वृद्धांच्या हत्येमुळे पुन्हा उसळला हिंसाचार; जिरीबाममधील 200 मैतेईंनी घरे सोडली
- महाराष्ट्रात पुढील 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा; विदर्भाला यलो, सिंधुदुर्गाला रेड अलर्ट, मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता
- नितीश कुमार यांचा निर्धार, मी कायम मोदींसोबत असेन, भाषणानंतर पंतप्रधानांचे चरण स्पर्श करू लागले तेव्हा मोदींनी हात धरला