• Download App
    सोशल मीडियावर आता अंकुश, गरज सभागृहात एकमत होण्याची गरज, अश्विनी वैष्णव यांची माहिती|Information on Ashwini Vaishnav, need to be unanimous in the House now, curb on social media

    सोशल मीडियावर आता अंकुश, गरज सभागृहात एकमत होण्याची गरज, अश्विनी वैष्णव यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सोशल मीडिया निरंकूश न राहता त्यावरील चुकीचे प्रकार टाळण्यासाठी अधिक कडक कायदे आणि निर्बंध लागू शकतात. सोशल मीडियासंदभार्तीय नियम अधिक कडक करण्याचा सरकारचा मानस असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रीअश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत सांगितले.Information on Ashwini Vaishnav, need to be unanimous in the House now, curb on social media

    सभागृहात एकमत झाल्यास सोशल मीडिया कंपन्यांना अधिक जबाबदार करणं आणि सोशल मीडियावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणं यासाठी हे पाऊल उचलण्यात येईल, त्यासाठी सरकार तयार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. सोशल मीडियाशी निगडीत सायबर गुन्ह्यांना म्हणावा तसा न्याय मिळत नाही.



    सध्या या प्रकारचे गुन्हे अधिक वाढले असून त्यासंदर्भात अधिक सजगता आणि कठोर नियमांची आवश्यकता सातत्याने बोलून दाखवली जाते. याचसंदर्भात आता सरकारने राज्यसभेत माहिती दिली आहे.
    राज्यसभेत काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

    सोशल मीडिया कंपनींना अधिक उत्तरदायी आणि जबाबदार ठरवण्यासाठी सरकार काय करतंय, या प्रश्नावर उत्तर देताना वैष्णव म्हणाले की, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी इंडियन कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अहवालाच्या आधारे कारवाई करतात.

    एक मध्यवर्ती पोर्टल देखील आहे जिथे अशा प्रकरणांची नोंदणी केली जाऊ शकते आणि संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणाºया एजन्सीकडे पाठविली जाऊ शकते. मी तुमच्याशी सहमत आहे की आपण एक समाज म्हणून पुढे येऊन अधिक उत्तरदायित्व आणि जबाबदारीची भावना आपण निर्माण केली पाहिजे.

    Information on Ashwini Vaishnav, need to be unanimous in the House now, curb on social media

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य