विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेतील सुरक्षा व्यवस्थेचा भंग करून घुसखोरीचे कारस्थान रचल्याबद्दल 6 आरोपींवर वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल केले असून या घुसखोरीच्या तारा थेट देशद्रोहापर्यंत जाऊन भिडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. Infiltration of Lok Sabha leads to treason
त्यामुळे 6 आरोपींवर संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याबद्दल कलम 120-बी (गुन्हेगारी कट), 452 (अतिक्रमण), कलम 153 (दंगल घडवण्याच्या हेतूने चिथावणी देणे), 186 (सार्वजनिक कार्यात सार्वजनिक सेवकांना अडथळा आणणे), 353 (हल्ला किंवा फौजदारी बळजबरी) अंतर्गत गुन्हा सार्वजनिक सेवकांना त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी) आयपीसी आणि UAPA च्या 16 आणि 18 कलमांची पार्लमेंट स्ट्रीट पीएस येथे नोंदणी करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण विशेष कक्षाकडे वर्ग केले असून आहे. 5 जणांना अटक करण्यात आली आहे. विकी शर्मा आणि त्याच्या पत्नीची चौकशी सुरू आहे, अशी अधिकृत माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
सर्व आरोपींनी दीड वर्षांपूर्वी सदनात घुसण्याचे कारस्थान रचले होते. त्यांनी घुसखोरीच्या तयारीसाठी 9 महिन्यांपूर्वी बैठकही घेतली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या नियमित संपर्कात होते.
लोकसभा सचिवालयाच्या विनंतीवरून गृह मंत्रालयाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात इतर सुरक्षा संस्था आणि तज्ज्ञांचा समावेश आहे.
एकूण 6 आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघे आत घुसले होते, तर दोघे बाहेर आंदोलन करत होते. चौकशीत आणखी दोन जणांची नावे समोर आली. पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून 1 जण फरार आहे. संसदे बाहेर आंदोलन करणाऱ्या दोघांनी आणि संसदेत प्रत्यक्ष घुसलेल्या दोघांनी आपण बेरोजगार असल्याचे भासवले होते. सुरुवातीला त्यांनी दिलेल्या घोषणांवरून देखील देशातली बेरोजगारीची समस्या त्यांना हायलाईट करायची आहे, असेच वाटत होते. पण प्रत्यक्षात नीलम आझादही आंदोलनजीवी निघाली. तिचे वेगवेगळे शेतकरी आंदोलनातले आणि काँग्रेससाठी प्रचार करणारे व्हिडिओ व्हायरल झाले. पोलिसांच्या तपासात या सर्वांच्या तारा थेट देशद्रोहाशी जुळल्याचे प्राथमिक तपासतच उघड झाले आणि त्यानंतर UAPA कायद्याअंतर्गत कठोर कारवाईला सुरुवात झाली.
सुरक्षा प्रोटोकॉल मध्ये बदल
नव्या संसदेत घुसखोरी केल्यानंतर आता सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये अनेक बदल केले जात आहेत.
1. खासदार, कर्मचारी आणि पत्रकारांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वारे असतील. चौथ्या गेटमधून अभ्यागतांना प्रवेश दिला जाईल.
2. अभ्यागत पास जारी करणे सध्या थांबवण्यात आले आहे.
3. प्रेक्षक गॅलरीच्या आजूबाजूला काचेचे तावदान बसवले जाईल, जेणेकरून कोणीही उडी मारून सभागृहात प्रवेश करू शकणार नाही.
4. विमानतळांप्रमाणे बॉडी स्कॅन मशीन्स बसवण्यात येतील.
5. सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवली जाईल.
काही चुकले असेल, तर मुलाला फाशी द्या
डी. मनोरंजन हा कर्नाटकातील म्हैसूरचा रहिवासी आहेत. त्याने 2016 मध्ये अभियांत्रिकी पदवी (BE) पूर्ण केली. दिल्ली आणि बंगळुरू येथील काही कंपन्यांमध्येही काम केले. आता तो कुटुंबासह शेतीची कामे पाहत होता. मनोरंजन याने भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या कार्यालयातून लोकसभेत प्रवेशासाठी पास घेतला होता. त्याने सागर शर्माला आपला मित्र म्हटले होते.
माझ्या मुलाने चूक केली असेल तर त्याला फाशी द्या, असे मनोरंजनचे वडील देवराज गौडा म्हणाले. ती संसद आमची आहे. महात्मा गांधी आणि नेहरूंसारख्या नेत्यांनी ती घडवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. मात्र, आपला मुलगा प्रामाणिक आणि सत्यवादी असल्याचा दावाही त्यांनी केला. समाजाचे भले करणे आणि समाजासाठी त्याग करणे हीच त्याची इच्छा असते.
पोलिस भरतीची अमोलची हूल
अमोल शिंदे (25) हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील झरी गावचा रहिवासी आहे. त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. पोलीस आणि सैन्य भरती परीक्षेची तयारी करत असताना त्यांनी रोजंदारी मजूर म्हणून काम केले. अमोलचे आई-वडील आणि दोन भाऊही मोलमजुरी करतात. अमोलच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तो 9 डिसेंबर रोजी सैन्य भरतीसाठी दिल्लीला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. त्याने याआधीही अशा अनेक भरती परीक्षांमध्ये भाग घेतला होता, त्यामुळे त्याच्या पालकांना शंका आली नव्हती.
या 5 पात्रांशिवाय आणखी एक नाव समोर आलं आहे. ते म्हणजे ललित, जो हरियाणाचा रहिवासी आहे. याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. तो फरार आहे. त्याच्या शोधासाठी छापेमारी सुरू असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांची केंद्रीय यंत्रणा चौकशी करत आहेत.
Infiltration of Lok Sabha leads to treason
महत्वाच्या बातम्या
- संसदेतले घुसखोर दाखवायला गेले बेरोजगारी; प्रत्यक्षात निघाले काँग्रेसी – डावे आंदोलनजीवी!!
- मध्य प्रदेशात “मोहन यादवी” कायदेशीर दंडा सुरू; मशिदींवरच्या लाऊड स्पीकरला चाप; खुल्यावर मांस विक्रीलाही बंदी!!
- धीरज साहू यांच्या घरात सापडलेल्या रोख रकमेनंतर आता घरातील सोन्याचा शोध घेण सुरू
- संसद घुसखोरीत अटक झालेली नीलम सामील होती फुटीरतावाद्यांच्या शेतकरी आंदोलनात; चौघांच्या कारस्थानाचा उलगडा!!