• Download App
    भारत आणि चीनमध्ये सीमा निश्चितीबाबत अंतिम करार होइपर्यंत चकमकी अटळ - लष्करप्रमुख नरवणे |Indo – China tension will not end

    भारत आणि चीनमध्ये सीमा निश्चितीबाबत अंतिम करार होइपर्यंत चकमकी अटळ – लष्करप्रमुख नरवणे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सीमा निश्चितीबाबत अंतिम करार होत नाही तोपर्यंत सीमेवर चकमकीच्या घटना घडतच राहतील, असे मत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मांडले.Indo – China tension will not end

    नरवणे म्हणाले की, ‘‘ आपला चीनशी सीमेवरून वाद आहे. याआधी चीनने जशा कुरापती केल्या तशाच भविष्यात केल्या तर त्याला सडेतोड उत्तर देऊ. सीमावादावर अंतिम तोडगा निघत नाही तोपर्यंत या चकमकी होतच राहतील.



    आपल्यालाही वेगाने हालचाली कराव्या लागतील तसे झाले तरच देशाच्या उत्तर सीमेवर शांतता निर्माण होऊ शकेल.’’ अफगाणिस्तानच्या संभाव्य धोक्याचे आम्ही वेळोवेळी मूल्यमापन करत आहोत. या आधारावर रणनीती देखील आखली जात आहे.

    सध्या तालिबानी हे अफगाणिस्तानचे सत्ताधारी बनले असून भारताने त्याबाबत संयुक्त राष्ट्रांत जाहीर चिंता व्यक्त केली होती. या देशाचा भूभाग हा दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात येऊ नये असेही बजावले होते.

    याबाबत भाष्य करताना नरवणे म्हणाले की, दहशतवादी कारवायांचा विचार केला तर आम्ही सर्व आव्हानांना सामोरे जायला तयार आहोत. जम्मू काश्मीररमध्ये आम्ही अधिक प्रभावीपणे दहशतवादविरोधी मोहीम राबविली आहे.

    Indo – China tension will not end

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची