वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सीमा वादानंतर आता भारत आणि चीन पत्रकारांना दिलेल्या व्हिसाच्या मुद्द्यावरून समोरासमोर आले आहेत. आपल्या पत्रकारांच्या व्हिसाचे नूतनीकरण न केल्याचा आरोप करत चीनने भारताला कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. अमेरिकन मीडिया हाऊस वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, दोन्ही देशांनी एकमेकांच्या पत्रकारांना आपापल्या देशातून हाकलून दिले आहे.Indo-China journalist visa dispute, first time since 1980s no Chinese journalist in India, both countries expel each other’s journalists
यामुळे 1980 नंतर पहिल्यांदाच भारतात एकही चिनी पत्रकार नसल्याची घटना घडली आहे. रिपोर्टनुसार, भारताने चीनची राज्य वृत्तसंस्था शिन्हुआ आणि ब्रॉडकास्टर सीसीटीव्हीच्या दोन पत्रकारांच्या व्हिसाचे नूतनीकरण करण्यास नकार दिला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही बुधवारी हा दावा केला आहे.
चीनचा आरोप- भारतात आमच्या पत्रकारांशी भेदभाव केला जात आहे
भारत आपल्या पत्रकारांशी भेदभाव करत असल्याचा आरोप चीनने केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी एका प्रेस ब्रीफिंग दरम्यान सांगितले की, मी इतकेच सांगू शकतो की बऱ्याच काळापासून चिनी मीडिया कर्मचार्यांशी भारतात भेदभाव केला जात होता.
निंग पुढे म्हणाले- 2017 मध्येही भारताने कोणतेही कारण न देता चिनी पत्रकारांच्या व्हिसाची वेळ कमी केली होती. या सर्व परिस्थितीत चीनकडे भारताविरुद्ध कठोर पावले उचलण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.
चीनने 2 भारतीय पत्रकारांचीही केली हकालपट्टी
चीनने 2 भारतीय पत्रकारांचीही हकालपट्टी केली आहे. यातील एक पत्रकार ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राचा, तर दुसरा प्रसार भारतीचा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वॉल स्ट्रीट जर्नलचा अहवाल येण्यापूर्वीच भारतातील चिनी दूतावासाने ट्विट केले होते.
त्यात त्यांनी यावर्षी सुमारे 60 हजार भारतीयांना व्यवसाय, अभ्यास, प्रवास आणि नातेवाइकांना भेटण्यासाठी व्हिसा दिल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण व्हिसा वादासाठी चीनने भारताला जबाबदार धरले आहे. यासोबतच त्यांनी भारताला हे प्रकरण सोडवण्याचे आवाहन केल्याचे सांगितले आहे.
Indo-China journalist visa dispute, first time since 1980s no Chinese journalist in India, both countries expel each other’s journalists
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी यांनी मुस्लिम लीगला दिले धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रमाणपत्र, भाजपचा पलटवार- असे सांगणे त्यांची मजबुरी!
- Chief Minister Relief Fund : आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला आज ३५० वर्षे पूर्ण
- मुंबईच्या मालवणीत बांगलादेशींनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा