नाशिक : “न जात पर न पात पर, मुहर लगेगी हाथ पर”, आजीच्या या मूळ घोषणेवर नातवाने बोळा फिरवला. छत्तीसगडच्या काँग्रेसच्या निवडणूक प्रचारात राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचे आश्वासन देऊन जनतेला जातीपातींमध्ये वाटण्याला चिथावणी दिली. पण याचवेळी त्यांनी आपल्याच आजीने दिलेल्या मूळ घोषणेला हरताळ फासला. Indira Gandhi was against casteism but rahul Gandhi assure caste based census
याची कहाणी अशी :
राहुल गांधी आज काँग्रेसच्या राजकारणासाठी जातनिहाय जनगणनेची वकिली करत आहेत. प्रत्येक रॅलीमध्ये ते जातीपातीचाच मुद्दा उचलून धरत आहेत. छत्तीसगडमधल्या निवडणूक प्रचारात राहुल गांधींनी, 2024 मध्ये केंद्रात काँग्रेस प्रणित “इंडिया” आघाडीची सत्ता आली, तर दोन तासांत जातनिहाय जनगणना सुरू करू. छत्तीसगडमध्ये सत्ता आली, तर राज्यात ताबडतोब जातनिहाय जनगणना सुरू करू, असे आश्वासन दिले. पण हे आश्वासन देतानाच त्यांनी आपल्याच आजीने दिलेल्या जुन्या घोषणेला हरताळ फासला.
पण 1980 मध्ये भारतीय राजकारणात पुनरागमन करताना इंदिरा गांधींनी मात्र जातीपातींच्या पलीकडे जाणारी व्यापक घोषणा दिली होती. 1978 मध्ये इंदिरा गांधी चिकमंगळूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत निवडून आल्या. पण जनता पार्टी सरकारने त्यांना आणीबाणीतील अत्याचारांच्या केस मध्ये एक महिन्यासाठी तुरुंगात पाठविले. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली.
पण 1980 मध्ये लोकसभा निवडणुकीत नवी स्ट्रॅटेजी वापरत इंदिरा गांधींनी कमबॅक केले. 1980 च्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसला हाताचा पंजा हे चिन्ह मिळाले होते, तर भाजपची स्थापना होत त्यांना कमळ हे चिन्ह मिळाले होते. त्यावेळी कम्युनिस्ट पार्टीही जोरात होती. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नव्या चिन्हांची खिल्ली उडवण्यासाठी कम्युनिस्ट पार्टीने त्यावेळी घोषणा दिली होती, “चलेगा मजदूर उडेगी धूल, ना रहेगा हाथ न रहेगा फुल” या घोषणेमुळे मोठा चमत्कार घडून आपल्याला देशात फार मोठे यश मिळेल असे कम्युनिस्टांना वाटले होते.
पण त्यावेळी इंदिरा गांधींचे निवडणूक रणनीतीकार साहित्यिक श्रीकांत वर्मा यांनी त्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी एक प्रतिघोषणा तयार केली, ती म्हणजे “न जात पर न पात पर, इंदिरा की बात पर, मुहर लगेगी हाथ पर”, ही ती घोषणा होती. या घोषणेने तमाम भारतीय मतदारांवर जादू केली आणि इंदिरा गांधींनी जबरदस्त कमबॅक करत 351 जागा जिंकल्या. कम्युनिस्टांचा विळा हातोडा आणि भाजपचे कमळ धुळीला मिळाले.
इंदिरा गांधी दिमाखात भारताच्या सत्तेवर परतल्या. त्यानंतरच्या प्रत्येक भाषणांमध्ये इंदिरा गांधी आवर्जून जातीयवाद विरोधी भूमिका घ्यायच्या. अगदी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणांमध्ये देखील त्याचेच प्रतिबिंब उमटायचे. भारताला विकास साधायचा असेल तर देशवासीयांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. गुणवत्तेला न्याय दिला पाहिजे, असे त्यांनी अनेक भाषणांमधून सांगितले होते. त्याचे व्हिडिओ आजही youtube वर उपलब्ध आहेत.
पण आता मात्र राहुल गांधींनी काँग्रेसच्या भूमिकेत पूर्णपणे 360 अंशात बदल केला आहे. आपल्याच आजीचे जात-पात विरोधी धोरण बदलून राहुल गांधी जातनिहाय जनगणनेच्या मागे लागून देशाला पुन्हा जातीपातीच्या राजकारणात लोटू पाहत आहेत.
जात-पात विरोधी राजकारण विकसित करत इंदिरा गांधी काँग्रेसी राजकारणाला प्रादेशिक राजकारणाच्या पलीकडे घेऊन गेल्या होत्या. काँग्रेसच्या राजकारणाला व्यापक तात्त्विक आधार दिला होता. त्या उलट राहुल गांधी आज प्रादेशिक जातसमूहांच्या नेत्यांच्या नादी लागून आपल्याच आजीने तयार केलेली काँग्रेसची मूळ भूमिका विसरले आहेत.
Indira Gandhi was against casteism but rahul Gandhi assure caste based census
महत्वाच्या बातम्या
- थकीत कर्जाची वसुली संध्याकाळी 7 नंतर बंद; एजंट सकाळी 8 वाजेपर्यंत कॉल करू शकणार नाहीत, RBI ने आणले नवीन नियम
- टाटा समूह भारतात आयफोन बनवणार; टाटाचा विस्ट्रॉनशी 1,000 कोटी रुपयांचा करार, 2.5 वर्षांत सुरू होईल उत्पादन
- काँग्रेसच्या मित्रपक्षांनी सनातन धर्माचा अपमान केला तर बघेल गप्प का बसले?’, भाजपाचा थेट सवाल!
- केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, ”सीमेपलीकडून गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठी घट , मात्र…”