जाणून घ्या, संपूर्ण घटनाक्रम
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रांची-दिल्ली इंडिगो विमानामध्ये जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या एका सहा महिन्यांच्या बाळाला शनिवारी श्वास घेण्यास प्रचंड त्रास जाणवू लागला. अशावेळी डॉक्टर असलेले दोन सहप्रवासी देवदूताप्रमाणे त्या चिमुकल्याच्या मदतीसाठी पुढे आले आणि त्याचा जीव वाचवला. two doctors saved the life of a six month old baby on a plane
आयएएस अधिकारी आणि प्रशिक्षित डॉक्टर असणारे डॉ नितीन कुलकर्णी आणि रांची सदर रुग्णालयातील एक डॉक्टर यांनी वैद्यकीय मदत म्हणून प्रौढांसाठी असलेल्या मास्क आणि इतर औषधांचा वापर करून ऑक्सिजन प्रदान केला आणि मुलावर उपचार केले.
सकाळी ९.२५ वाजता विमान विमानतळावर उतरल्यानंतर वैद्यकीय पथकाने बाळाला आपल्या देखरेखीखाली घेतले आणि ऑक्सिजनचा आधार दिला. मुलाला एम्समध्ये दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्याच विमानामधून प्रवास करत असलेल्या ए.एस. देओल या प्रवाशाने आपल्या ट्वीटरद्वारे झारखंडच्या राज्यपालांना टॅग करत पोस्ट केली की, डॉक्टर देवदूत आहेत,यांनी आज इंडिगो विमानात एका सहा महिन्यांच्या बाळाचा जीव वाचवला. आयएएस नितीन कुलकर्णी यांनी एका डॉक्टराची भूमिका बजावली आणि बाळाला वाचवले, तुम्हाला सलाम सर.
रविवारी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी आयएएस कुलकर्णी यांचा गौरव केला. ते म्हणाले,”आम्हाला तुमच्या उदात्त कार्याचा अभिमान आहे. हे मानव सेवेचे उदाहरण आहे, एका मुलाचे प्राण वाचवण्यात तुमची तत्परता प्रशंसनीय आहे. मानवतेची सेवा करण्याचे तुमचे कार्य इतरांसाठी अनुकरणीय आहे.”
डॉ. कुलकर्णी, जे सध्या झारखंडच्या राज्यपालांचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत आणि रांची सदर रुग्णालयातील मोहम्मद फिरोज यांनी मुलाला वाचवण्यासाठी तत्काळ प्रतिसाद दिला. कुलकर्णी यांनी तातडीने सीपीआर देण्यास सुरुवात केली. “माझ्या पदावरील कोणीही केले असते ते मी केले. समाजाचे सदस्य या नात्याने आपण सर्वांची ही जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.
two doctors saved the life of a six month old baby on a plane
महत्वाच्या बातम्या
- ”मी लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार” राज ठाकरेंचं विधान!
- Manipur Violence : मणिपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी चौघांना अटक, दोघे ताब्यात
- देशभरात GST भरण्यात 10.2 % वाढ; 1.63 लाख कोटी जमा; महाराष्ट्र टॉपवर!!
- कावेरी पाणी वादावरून काँग्रेसमध्ये तेढ! आयोगाच्या निर्णयाला विरोध करत असताना,