विशेष प्रतिनिधी
दिल्ली : जागतिक बाजारपेठेत भारतीय तांदळाला प्रचंड मागणी आहे. भारताने तांदूळ निर्यातीत मोठी मजल।मारली आहे. आफ्रिकन, आशियाई आणि अनेक युरोपियन बाजारपेठेमध्ये भारताच्या तांदळाला प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच भारताचे राईस एक्स्पोर्ट करण्याचे प्रमाण वाढले आहे.
India’s rice exports increase in first 7 months of 2020-21
2020-21 मध्ये 2019-20 मधील 9.49 MT वर 87% वाढ झाली होती. 2020-21 मध्ये 17.72 दशलक्ष टन(MT) इतकी भरमसाठ भारताची राईस निर्यात वाढली होती. चालू आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये पहिल्या 7 महिन्यांतच म्हणजेच एप्रिलपासून ते ऑक्टोबरपर्यंत भारताचे तांदूळ निर्यात 8.91 मेट्रिक टनांवरून 33 टक्क्यांनी वाढून 11.79 मेट्रिक टन झाली आहे.
भारतातर्फे तिमोर लेस्ते, पोर्तो रिको, ब्राझील, पापुआ न्यू गिनी, झिम्बाब्वे, बुरुंडी, इसवाटीनी, म्यानमार, निकाराग्वा या नऊ देशांमध्ये बासमती सोडून अन्य तांदळाची निर्यात केली जाते. तर सौदी अरेबिया, इराण, इराक, येमेन, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कुवेत, यूके, कतार, ओमान या देशांमध्ये बासमती तांदळाची निर्यात केले जाते.
कोरोनाच्या काळामध्ये अनेक वस्तू पुरवठय़ाची साखळी तुटली आहे. त्यामुळे भारतातून तांदळाची निर्यातीच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. तसेच तांदळासोबतच इतर तृणधान्याच्या निर्यातीमध्येदेखील वाढ झालेली आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातर्फे काकीनाडा, विशाखापट्टणम, चेन्नई, मुंद्रा, कृष्णपट्टणम, पारादिप येथील बंदरांमध्ये अनेक सोयीसुविधांची सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे देखील तांदूळ निर्यातीला चालना मिळाली आहे.
India’s rice exports increase in first 7 months of 2020-21
महत्त्वाच्या बातम्या
- OMICRON : युरोपात कोरोनाचा कहर ; इंग्लंडमध्ये एका दिवसांत 88 हजार
- तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम, माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित असल्याचे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले
- अभिनेत्री अलिया भट्टवर होणार कारवाई, हाय रिस्क संपर्कात येऊनही होम क्वारंटाईनचा भंग
- विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड ठाकरे सरकारचे लक्ष्य, आता कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरविणार, आशिष शेलार यांचा आरोप
- काका- पुतण्याची युती, मात्र स्वत;च्या पक्षांची ओळख कायम ठेऊन सोबत लढणार