• Download App
    Ashwini Vaishnaw 10 महिन्यांत तयार होईल भारताचा स्वतःचा एआय

    Ashwini Vaishnaw : 10 महिन्यांत तयार होईल भारताचा स्वतःचा एआय चॅटबॉट; रूपरेषा तयार, अमेरिका-चीनला आव्हान देण्याची तयारी

    Ashwini Vaishnaw

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : Ashwini Vaishnaw  चीन आणि अमेरिकेशी स्पर्धा करण्यासाठी भारत पुढील १० महिन्यांत स्वतःचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) चॅटबॉट तयार करेल. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी ही घोषणा केली. देशातील लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) १० महिन्यांत तयार होईल, अशी माहिती त्यांनी दिली. हे मूलभूत मॉडेल असेल. त्याची रूपरेषा तयार करण्यात आली आहे.Ashwini Vaishnaw

    त्यांनी सांगितले की एआयसाठी संगणकीय पायाभूत सुविधा सर्वात महत्त्वाची आहे. भारताने याबाबतीत १० हजार जीपीयू क्षमतेचे लक्ष्य गाठले आहे. ते आता १८६०० जीपीयूपर्यंत वाढवण्यात येणार आहे. जीपीयू म्हणजे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (चिप). कोणत्याही प्रकारचे भाषा मॉडेल तयार करण्यासाठी खूप प्रगत जीपीयूची आवश्यकता असते. अलीकडेच, जगभरात खळबळ माजवणाऱ्या चीनच्या डीपसीक एआय चॅटबॉट आर-१ ने २००० जीपीयू क्षमतेचा वापर केला, तर अमेरिकन एआय कंपनी ‘ओपन एआय’ च्या ‘चॅटबाॅट चॅट जीपीटी’ साठी २५ हजार जीपीयूची क्षमता वापरली जाते. भारतात सध्या १५ हजार जीपीयू क्षमता आहे. आम्ही १८ हजार जीपीयूसह एक सामायिक संगणन सुविधा सुरू केली आहे, जी स्टार्टअप, संशोधक आणि विकासकांसाठी उपलब्ध असेल. वैष्णव म्हणाले की डीपसीकमध्ये गोपनीयतेची चिंता आहे, त्यामुळे त्याचा डेटा भारतीय सर्व्हरवर संग्रहित केला जाईल.



    डीपसीकने ओपन सोर्स इमेज जनरेशन मॉडेल लाँच केले…

    चीनी स्टार्टअप डीपसीकने नवीन एआय इनोव्हेशन ओपन सोर्स इमेज जनरेशन मॉडेल ‘जेनस प्राे ७ बी’ लाँच केले आहे. हे ‘ओपन एआय’ च्या ‘डेल – इ३’ पेक्षा चांगले आहे. चॅटबॉट्सवर अचूक प्रतिमा तयार करण्यात आणि त्याचा अर्थ स्पष्ट करण्यात ते अचूक आहे.

    पुढील आठवड्यात भारतात येऊ शकतात ‘ओपन एआय’ प्रमुख ऑल्टमन

    मायक्रोसॉफ्टच्या एआय संशोधन संस्थेचे प्रमुख सॅम ऑल्टमन हे फेब्रुवारीमध्ये दिल्लीला भेट देऊ शकतात. या दाैऱ्यात ते भारतीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. जपानची सॉफ्टबँक ‘ओपन एआय’ मध्ये २.१५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

    ८.८५ लाख कोटी रुपयांचा असेल भारताचा सेमीकंडक्टर बाजार

    इंडिया इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर असोसिएशनच्या अहवालात म्हटले आहे की २०२४ मध्ये भारतातील सेमीकंडक्टर (चिप) बाजार ४.४७ लाख कोटी रुपयांचा हाेता. जाे २०३० पर्यंत ८.८५ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. त्यातील ७०% हिस्सा मोबाइल हँडसेट आणि आयटीमध्ये वापरला जातो.

    India’s own AI chatbot will be ready in 10 months; Outline ready, ready to challenge America-China

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी