• Download App
    तुर्कस्तानात भारताचे ऑपरेशन दोस्त : भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 वर्षीय बालिकेची एनडीआरएफने केली सुटका India's Operation Dost in Turkey NDRF rescues 8-year-old girl trapped under rubble after earthquake

    तुर्कस्तानात भारताचे ऑपरेशन दोस्त : भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 वर्षीय बालिकेची एनडीआरएफने केली सुटका

    वृत्तसंस्था

    अंकारा : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 22765 लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींची संख्या 75 हजारांच्या आसपास आहे. ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत भारत दोन्ही देशांना मदत करत आहे. भारतातील नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) टीम देखील तुर्की आणि सीरियामध्ये बचाव कार्यात गुंतलेली आहे. दरम्यान, तुर्कस्तानमधील भूकंपग्रस्त भागात ढिगाऱ्यात अडकलेल्या 8 वर्षीय मुलीची एनडीआरएफच्या टीमने सुखरूप सुटका केली आहे. India’s Operation Dost in Turkey NDRF rescues 8-year-old girl trapped under rubble after earthquake

    अधिकृत प्रवक्त्याने शुक्रवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. एनडीआरएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, तुर्की लष्कराच्या जवानांसोबत गाझियानटेप प्रांतातील नुरदागी शहरात हे बचाव कार्य करण्यात आले. एनडीआरएफच्या जवानांनी गुरुवारी या भागातून एका 6 वर्षीय मुलीची सुटका केली होती. गृहमंत्रालयाने याबाबत माहिती दिली होती.



    “बचावकर्त्यांनी आतापर्यंत दोन जीव वाचवले आहेत आणि ढिगाऱ्यातून 13 मृतदेह बाहेर काढले आहेत. एनडीआरएफचे बचावकार्य 7 फेब्रुवारीपासून तुर्कस्तानच्या बाधित भागात सुरू आहे,” असे प्रवक्त्याने सांगितले. सोमवारच्या विनाशकारी भूकंपानंतर तुर्कस्तान आणि सीरियाला मदत पुरवण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ सुरू केले. 152 जवानांसह NDRFच्या तीन टीम भारतातून तुर्कीला पाठवण्यात आल्या आहेत.

    सोमवारी पहाटे तुर्कस्तानमधील गॅझियानटेपमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. काही मिनिटांनंतर, मध्य तुर्कीमध्ये आणखी 7.5 तीव्रतेचा भूकंप झाला. यानंतर अनेक वेळा आफ्टरशॉक जाणवले. दरम्यान, या विनाशकारी भूकंपाने तुर्कस्तानला सुमारे 10 फूट (5-6 मीटर) ने हलवल्याचे एक नवीन मूल्यांकन समोर आले आहे. या आपत्तीत हजारो इमारतींचे नुकसान झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, भूकंपामुळे 2.3 कोटींहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.

    तुर्कस्तान आणि सीरियात मोठा विध्वंस

    भूकंपामुळे तुर्कस्तानचे अंताक्या, सानलिउर्फा आणि सीरियातील अलेप्पो शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. येथील पाणी व वीजपुरवठाही बंद आहे. लोकांना निवारागृहात राहावे लागत आहे. खाद्यपदार्थही येथे मिळत नाहीत. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या गझियानटेप शहरातील लोकांचे म्हणणे आहे की, विनाशानंतर 12 तासांनंतरही त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली नाही.

    95 देश मदतीला आले पुढे

    या नैसर्गिक आपत्तीमध्ये जगभरातील 95 देश तुर्की आणि सीरियाच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत भारत दोन्ही देशांना मदत पाठवत आहे. भारताने तुर्कीमध्ये फील्ड हॉस्पिटलचे कामही सुरू केले आहे. त्याचबरोबर एनडीआरएफच्या अनेक तुकड्या दोन्ही देशांमध्ये बचाव कार्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत.

    India’s Operation Dost in Turkey NDRF rescues 8-year-old girl trapped under rubble after earthquake

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!