• Download App
    भारताचे नवे पेंटॅगॉन : भारतीय लष्कराला मिळणार दिल्लीत 832 कोटींचे नवे हेडक्वार्टर!!|India's new Pentagon: Indian Army will get a new headquarters worth 832 crores in Delhi!!

    भारताचे नवे पेंटॅगॉन : भारतीय लष्कराला मिळणार दिल्लीत 832 कोटींचे नवे हेडक्वार्टर!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताला नवी भव्य संसद तर मिळाली आहेच, पण त्या पाठोपाठ राजधानी नवी दिल्लीत आता भारतीय लष्कराला देखील स्वतःचे असे नवे हेडक्वार्टर्स मिळणार आहे. तब्बल 832 कोटी रुपये खर्च करून बनविण्यात येत असलेल्या या हेडक्वार्टर्सची प्रेरणा भारतीय सैन्य दलाच्या दोन क्रॉस तलवारी या लोगो मधून घेण्यात आली आहे.India’s new Pentagon: Indian Army will get a new headquarters worth 832 crores in Delhi!!

    अमेरिकन संरक्षण मंत्रालय आणि लष्करी मुख्यालय पेंटॅगॉन म्हणून ओळखण्यात येते, कारण ते पंचकोनी आहे. भारताचे नवे लष्करी मुख्यालय देखील अशाच स्वरूपाचे असून भारतीय लष्कराचा लोगो दोन क्रॉस तलवारी यावर आधारित त्याची रचना असणार आहे. येत्या दोन वर्षांमध्ये म्हणजे जून 2025 पर्यंत हे मुख्यालय बांधून तयार होणे अपेक्षित आहे.



    केंद्रातल्या मोदी सरकारने डायमंड रिंगच्या आकाराची नवी भारतीय संसद बांधली आहेच. त्या पाठोपाठ भारतीय लष्कराचे देखील मोठे मुख्यालय तयार होत आहे. या मुख्यालयात 1700 लष्करी आणि मुलगी अधिकारी त्याचबरोबर अन्य 1300 स्टाफची व्यवस्था असणार आहे.

    मोदी सरकारच्याच कारकीर्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराच्या प्रेरणेतून भारतीय नौदलाने स्वतःचा नवा एम्बल्म तयार करून तो स्वीकारला. त्या पाठोपाठ आता भारतीय लष्कराला देखील पेंटॅगॉनच्या धर्तीवर स्वतःचे मुख्यालय मिळणार आहे.

    India’s new Pentagon: Indian Army will get a new headquarters worth 832 crores in Delhi!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य