वृत्तसंस्था
हांगझोऊ : 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुष संघाने 10 मीटर एअर रायफलमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुष संघाने 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. भारतीय नेमबाज ऐश्वर्या प्रताप सिंह, दिव्यांश सिंह आणि रुद्रांक्ष पाटील यांनी 1893.7 गुण मिळवून भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले. तर रोईंगच्या पुरुष जोडी-4 मध्ये भारताला कांस्यपदक मिळाले. आता भारताच्या खात्यात 7 पदके झाली आहेत.India’s first gold medal in Asian Games; Gold for trio in 10m air rifle team event
रोइंगमध्ये भारताने जिंकली 4 पदके
रोइंगमध्ये भारताची आता 4 पदके झाली आहेत. ज्यामध्ये दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे.
भारताला पहिल्या दिवशी 3 रौप्य आणि 2 कांस्यपदके मिळाली
यापूर्वी भारताने पहिल्या दिवशी 5 पदके जिंकली होती. ज्यामध्ये रोइंगमध्ये तीन तर नेमबाजीमध्ये दोन पदके जिंकली. ज्यामध्ये रोइंगमध्ये दोन रौप्य आणि एक कांस्य पदकांचा समावेश होता. अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंह या जोडीने रोईंगच्या हलक्या वजनाच्या दुहेरी स्कल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. भारतीय पुरुष संघाने पुरुषांच्या 8 स्पर्धेत दुसरे स्थान मिळवून रौप्यपदक जिंकले. पुरुष जोडीच्या अंतिम फेरीत बाबूलाल यादव आणि लेखराम यांची जोडी तिस-या स्थानावर राहिली.
नेमबाजीत मेहुली घोष, रमिता आणि आशी चोक्सी यांच्या संघाने 10 मीटर एअर रायफलमध्ये 1880.0 गुणांसह रौप्यपदक जिंकले. रमिताने वैयक्तिक 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.
या खेळांमधून पदकाची आशा
रायफल शूटिंग
भारतीय नेमबाज अजूनही देशासाठी पदक जिंकू शकतात. पहिल्या दिवशी या खेळातून दोन पदके जिंकली. आज पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल आणि 25 मीटर पिस्तूल रॅपिड फायर इव्हेंट्सच्या सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धा होतील. यामध्ये पदके येऊ शकतात.
रोइंग
भारताच्या बलराज पनवारने पुरुषांच्या सिंगल स्कलमध्ये चौथे स्थान पटकावले. 18 खेळाडू रोइंगमध्ये आपली ताकद दाखवतील. पुरुषांच्या चार स्पर्धेत एक पदक येऊ शकते.
महिला क्रिकेट
भारतीय महिला संघ सुवर्णपदक जिंकू शकतो. अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. T-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाने 23 पैकी 18 वेळा श्रीलंकेचा पराभव केला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाकडे सुवर्ण जिंकण्याची संधी आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशला 51 धावांत ऑलआउट केले होते.
India’s first gold medal in Asian Games; Gold for trio in 10m air rifle team event
महत्वाच्या बातम्या
- PM मोदी आज 9 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार, या हायटेक ट्रेन 11 राज्यांमधून जाणार
- निक्की हेली म्हणाल्या- चीन युद्धाच्या तयारीत, अमेरिका आणि जगासाठी धोका, त्यांचे सैन्य अनेक बाबतींत पुढे
- गुगलला आव्हान देणार फोन पे; लाँच करणार स्वत:चे ॲप स्टोअर; अँड्रॉइड ॲप डेव्हलपर्सना निमंत्रण
- सर्वात मोठी कसिनो चेन असलेल्या डेल्टा कॉर्पला तब्बल 11,139 कोटींची GST नोटीस, कंपनीने कर न भरल्याचा आरोप