भारतात सोशल मीडियावर #BoycottMaldives ट्रेंड करत आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मालदीव स्वतः भारतासोबतचे संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. वादाच्या दरम्यान, EaseMyTrip चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी यांनी मालदीवच्या मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांनंतर मालदीवच्या सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केल्या आहेत.Indias displeasure will cost Maldives EaseMyTrip canceled all flight bookings
पंतप्रधान मोदींवर मालदीवच्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारतात सोशल मीडियावर #BoycottMaldives ट्रेंड करत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी मालदीवला जाण्याचा बेत रद्द केला आहे. भारतातून मोठ्या संख्येने लोक मालदीवला भेट देतात. अशा स्थितीत मालदीवच्या पर्यटनाला मोठा फटका बसू शकतो, असे मानले जात आहे.
न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या समर्थनार्थ निशांत पिट्टीने सोशल मीडिया साइटवर लिहिले आहे की, आपल्या देशाशी एकता दाखवत, EaseMyTrip ने मालदीवच्या सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केल्या आहेत.’ यासोबतच EaseMyTrip ने #ChaloLakshadweep मोहीम सुरू केली आहे.
X वरील त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिले की, ‘लक्षद्वीपचे पाणी आणि समुद्रकिनारे मालदीवसारखेच चांगले आहेत. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भेट दिलेल्या या प्राचीन स्थळाचा प्रचार करण्यासाठी आम्ही EaseMyTrip वर खास ऑफर घेऊन येत आहोत!”
पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीप मध्ये फक्त एक दिवस राहिले. लक्षद्वीपच्या आपल्या दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. तिथल्या पर्यटन संधीची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. वास्तविक पाहता याचा मालदीव नावाच्या देशाशी तसा थेट कुठलाही संबंध नव्हता, पण मोदींनी भारताच्या लक्षद्वीपला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणल्याने मालदीवच्या पर्यटनाला स्पर्धा निर्माण झाली असे मानून मालदीवच्या चीन धार्जिण्या सरकारचे मंत्री “जुना भारत” समजून “नव्या भारताशी” कुस्ती खेळायला गेले, पण मोदींच्या भारताने त्यांची ही मस्ती उतरवून टाकली!!
Indias displeasure will cost Maldives EaseMyTrip canceled all flight bookings
महत्वाच्या बातम्या
- बांगलादेशात शेख हसीनांचे सत्तेत पुनरागमन, पाचव्यांदा पंतप्रधान म्हणून निवड!
- INDIA आघाडीत फूट? जागावाटप झालेले नसताना केजरीवालांकडून उमेदवाराची घोषणा
- “जुना भारत” समजून खेळायला गेले कुस्ती; मोदींच्या नव्या भारताने उतरवली मालदीवची मस्ती!!
- टीएमसी नेत्याविरोधात जारी केलेल्या लुकआउट नोटीसीवरून काँग्रेसची खोचक टिप्पणी