• Download App
    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी|India's Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; 315 km on a single charge

    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी

    प्रतिनिधी

    मुंबई : टाटा मोटर्सने आज त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक टाटा टियागो (Tata Tiago) चे EV व्हेरियंट लाँच केले. याची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. या ईव्हीला एका चार्जमध्ये 315 किमीची रेंज मिळेल. बुकिंग 10 ऑक्टोबर 2022 पासून आणि वितरण जानेवारी 2023 पासून होईल.India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; 315 km on a single charge

    ऑटो दिग्गज आधीपासनूच Tata Nexon EV आणि Tata Tigor EV सारख्या मॉडेलसह देशातील ईव्ही सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. टाटा टियागो ही ईव्ही सेगमेंटमधील भारताची पहिली प्रीमियम हॅचबॅक बनली आहे. टियागो बॅटरीला DC फास्ट चार्जरने 80% पर्यंत चार्ज होण्यासाठी 57 मिनिटे लागतील.



    टियागोमध्ये 8 स्पीकर सिस्टम, रेन सेन्सिंग वायपर, क्रूझ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, इलेक्ट्रिक ORVM आणि बरेच काही फीचर्स देण्यात आले आहेत. दाव्यानुसार, Tiago EV ही भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे. या EV वर 1,60,000 किमी पर्यंत बॅटरी आणि मोटर वॉरंटी उपलब्ध असेल.

    टाटा टियागो EV मध्ये दोन ड्रायव्हिंग मोड उपलब्ध असतील. ही EV 5.7 सेकंदात 0 ते 60 kmph चा वेग पकडेल. Tiago EV च्या पहिल्या 10,000 बुकिंगपैकी 2,000 युनिट्स विद्यमान टाटा EV वापरकर्त्यांसाठी राखीव असतील.

    4 वर्षात 10 EV आणणार

    टाटा पुढील 4 वर्षांत 10 बॅटरी इलेक्ट्रिक वाहने सादर करण्याचा विचार करत आहे. 76 व्या वार्षिक अहवालात भागधारकांना संबोधित करताना, अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले होते की, भारतात आमच्या पोर्टफोलिओमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) प्रवेश आता या वर्षी दुप्पट होऊन 2% झाला आहे.

    ते म्हणाले की, येत्या काही वर्षांत आम्हाला वेगवान वाढ अपेक्षित आहे. 2025 पर्यंत, टाटा मोटर्सकडे 10 नवीन BEV वाहने असतील. टाटा समूह चार्जिंग पायाभूत सुविधांच्या उभारणीत गुंतवणूक करेल, तसेच सेल आणि बॅटरी उत्पादनामध्ये भागीदारी शोधण्याबरोबरच भारतात आणि त्यापुढील भागातही गुंतवणूक करेल.

    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; 315 km on a single charge

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात पुन्हा ड्रोन दिसले; होशियारपूरमध्ये 5-7 स्फोट, ब्लॅकआऊट

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!