वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपीय देशांनी आणि अमेरिकेने रशियावर अनेक आर्थिक निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताने काही आर्थिक पावले उचलल्याचे मानण्यात येत आहे.India’s Biggest Public Sector Bank SBI Stops All Transactions With Sanctioned Russian Entities
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकने रशियन संस्थांच्या व्यवहार थांबवल्याची बातमी आहे. मात्र या बातमीला अद्याप बँकेच्या अधिकृत सूत्रांनी दुजोरा दिलेला नाही. रशियन संस्थांच्या भारतीय स्टेट बँकेतील खात्यांमध्ये जे काही व्यवहार होत आहेत
ते थांबवल्याची बातमी रॉयटर या वृत्तसंस्थेने काही सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. युरोपीय आणि अमेरिकन संस्थांचे व्यवहार नुसार भारतीय स्टेट बँक देखील त्याचे अनुकरण करेल असे संबंधित सूत्रांनी रॉयटर वृत्तसंस्थेला सांगितल्याचे बातमीत म्हटले आहे. त्यामुळे रॉयटरने ही रशियन संस्थांची संबंधित व्यवहार भारतीय स्टेट बँकेने थांबवल्याची बातमी दिली आहे.
परंतु, त्याचबरोबर अधिकृतरीत्या केंद्र सरकारने आणि भारतीय स्टेट बँकेने याबाबत अद्याप तरी कोणताही खुलासा केलेला नाही, असेही त्या बातमीत स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय रशियन संस्थांशी व्यवहारांबाबत फक्त नवीन व्यवहार थांबवले असतील. जुन्या व्यवहारांशी त्याचा काहीही संबंध नाही किंवा जुन्या व्यवहारांवर त्याचा परिणाम होणार नाही, असेही रॉयटरच्या बातमीत नमूद करण्यात आले आहे.
India’s Biggest Public Sector Bank SBI Stops All Transactions With Sanctioned Russian Entities
महत्त्वाच्या बातम्या
- युक्रेनमध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, पण आजारपणामुळे!!
- Beed NCP : राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षावर सुनेला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल मात्र कारवाई नाही ; सुनेची थेट सुप्रिया सुळेंकडे तक्रार-आत्मदहनाचा इशारा …
- युक्रेन मध्ये आणखी एका भारतीयाचा मृत्यू
- महाड ते रायगड राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू; खासदार संभाजीराजेंनी केली पाहणी; वाचा महामार्ग उभारणीचा इतिहास!!