वृत्तसंस्था
ढाका : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने हॉकीत पाकिस्तानविरोधात मोठा विजय मिळविला आहे. ३-१ अशा गोलफरकाने पराभव करून भारताने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.
बांगला देशाची राजधानी ढाका येथील मौलाना भसानी हॉकी स्टेडियम येथे हा सामना शुक्रवारी खेळविला गेला. India’s big win over Pakistan in hockey;
Defeated 3-1, entered the semifinals
हरमनप्रीतने दोन आणि आकाशदीपच्या एका गोल करून हा विजय भारताने सामना जिंकला आहे.पाकिस्तानला केवळ एकच गोल करता आला. हा गोल जुनैदने केला. हरमनप्रीतने दोनदा पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले. सामन्यात भारताने पहिल्यापासून आघाडी घेतली. ती पाकिस्तानी खेळाडूंना तोडता आली नाही.
सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी चांगला खेळ करून प्रत्येकी एक गोल केला. आकाशदीपने भारतासाठी दुसरा गोल करून २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर पाकिस्तानच्या जुनैद मंजूरने गोल करत भारताची आघाडी कमी केली. मात्र, नंतर हरमनप्रीतने या सामन्यात दुसरा गोल करत भारताला ३- १ अशी आघाडी मिळवून दिली, जी निर्णायक ठरली. भारताने सुरुवातीपासून आक्रमक आणि तडाखेबाज खेळ केला. त्यासमोर पाकिस्तानी खेळाडू तग धरू शकले नाहीत.
India’s big win over Pakistan in hockey; Defeated 3-1, entered the semifinals
महत्त्वाच्या बातम्या
- भारतात ओमीक्रोनचे १०१ रुग्ण; महाराष्ट्रात सर्वाधिक ३२ रुग्ण आढळले; दक्षता घेण्याचे केंद्राचे आवाहन
- मुलींचे लग्नाचे वय वाढवण्यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, मुस्लिम लीग आणि अन्य मुस्लिम लोकप्रतिनिधींचा विरोध!!
- ज्या लोकांनी या गैरव्यवहारामध्ये सहभाग घेतला असेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
- Asian Champions Trophy : चक दे ! भारताची पाकिस्तानवर ३-१ ने मात ; सेमीफायनलध्ये धडक ; भारत स्कोअर बोर्डवर अव्वल …