वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद्रकुमार जगन्नाथ यांनी नुकतेच मॉरिशसमध्ये 6 सामुदायिक विकास योजनांसोबत नवीन धावपट्टीचे उद्घाटन केले. हिंद महासागरात चीनच्या वाढत्या हालचालींना उत्तर देण्यासाठी भारताने मॉरिशससोबत संयुक्त लष्करी तळ स्थापन केला आहे. मुंबईहून ३,७२९ किमी पूर्वेला मॉरिशसच्या उत्तर अगालेगा बेटावर लष्करी तळासाठी पायाभूत सुविधा बनवल्या आहेत. येथून पश्चिम हिंद महासागरात चीन जहाजे, पाणबुड्यांची निगराणी होईल. India’s answer to China in the Indian Ocean; Indian base set up in Mauritius
भारताला घेरणे आणि हिंद महासागरात दबदबा वाढवण्यासाठी चीनने पाकिस्तानच्या ग्वादर, श्रीलंकेतील हंबनटोटापासून आफ्रिकी देशांतील अनेक बंदर प्रकल्पांत पैसा गुंतवला आहे. याच्या प्रत्युत्तरात भारत सरकारने २०१५ मध्ये हिंद महासागरात उपस्थिती वाढवण्यासाठी सागर प्रोजेक्ट सुरू केला होता.
चीनच्या पाणबुड्या, लढाऊ जहाजांवर भारताची नजर
अॉस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे थिंक टँक सॅम्युअल बेशफील्ड यांच्यानुसार, अगालेगा सर्वात महत्त्वाची शिपिंग लाइनवर आहे. त्यामुळे येथून जाणारे चीनचे कार्गो, लढाऊ जहाज आणि पाणबुड्यांवर लक्ष ठेवले जाऊ शकेल.
हिंद महासागराच्या सुरक्षेत तैनात भारतीय नौदलाच्या जहाजांना सध्या इंधन घेण्यासाठी ब्रिटिश-अमेरिकी लष्करी तळ डिएगो गार्शियाला जावे लागते. या तळानंतर लष्कराचा वेळ वाचेल.
सतत ताकद वाढवतोय चीन
हिंद महासागरात चीनची कुरापती वाढत आहेत. चीनने बीआरआय प्रोजेक्टच्या नावावर अनेक आफ्रिकी देशांच्या बंदरांवर कब्जा केला आहे.
चीनने जीबूतीचे डोकालेह, केनियाचे लामू आणि मोंबासा, टांझानियातील टेंगा व दार एस सलाम, मोझाम्बिकचा बेरा, द. आफ्रिकेतील रिचर्ड बे पोर्टशिवाय मेदागास्करचे सेंट मेरी पोर्ट भाडेतत्त्वार घेतले आहे. जाणकारांनुसार,चीन या बंदरांचा लष्करी वापर करू शकतो.