वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटाही भारताच्या कृषी निर्यातीत कोणताच खंड पडलेला नाही.या उलट निर्यातीत 18 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पियुष गोयल यांनी दिली.India’s agricultural exports grow by 18%,Supply intact in Corona crisis; Information of Minister Piyush Goyal
एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत कृषी आणि अन्नधान्यांची सुमारे 2.74 लाख कोटींची निर्यात केली. ती त्या पूर्वीच्या एवढ्याच कालावधीपेक्षा 18 टक्के अधिक आहे.
गहू, तांदूळ (बासमती नाही), सोया , मसाले, साखर, कच्चा कापूस, ताजा भाजीपाला, प्रक्रिया केलेल्या भाज्या आणि मद्य निर्यातीत सकारात्मक मोठी वाढ झाली.
गतवर्षीच्या तुलनेत गहू निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. ती 425 कोटी रुपयांवरुन 3 हजार 283 कोटी रुपयांवर पोचली आहे. भारताने लेबेनॉनला गहू निर्यात केला होता. त्याची टक्केवारी 72 टक्के आहे.
नाफेडने 50 हजार टन गहू अफगाणिस्तान आणि 40 हजार टन गहू लेबेनॉनला निर्यात केला आहे. कोरोना संकटातही भारताने कृषी निर्यात अखंड ठेऊन जागतिक अन्नपुरवठा साखळी तोडली नाही, हे या निर्यातीवरून स्पष्ट होते.
कृषीच्या आयातीत 3 टक्के वाढ
एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत भारताने 1.41 लाख कोटींच्या कृषी पदार्थांची आयात केली. ती या कालावधीच्या आधी 1.37 लाख कोटींची आयात केली होती. यंदा ती 3 टक्क्याने अधिक आहे.
एकंदरीत आयात आणि निर्यातीचा विचार केला तर कोरोना काळात कृषी निर्यात ही एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत 1.32 लाख कोटींची झाली असून याच कालावधीत 2019 ते 2020 दरम्यान, ती 93 हजार 907 कोटी एवढी होती.
India’s agricultural exports grow by 18%,Supply intact in Corona crisis; Information of Minister Piyush Goyal
महत्त्वाच्या बातम्या
- Nashik Oxygen Leak : नाशिकच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुख, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर
- दुर्दैवी घटनेतही राजकारण : सचिन सावंतांनी नाशिकच्या घटनेसाठी भाजपला ठरवले जबाबदार, कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर..
- Covaxin : कोरोनाच्या डबल म्युटेंटवरही कोव्हॅक्सिन परिणामकारक, संशोधनाअंती ICMRचा निष्कर्ष
- दुर्दैवाचा हृदय पिळवटून टाकणारा फेरा : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीनंतर 22 रुग्णांचा तडफडून मृत्यू! बळींची संख्या वाढण्याची भीती
- कॅप्टन कुल धोनीच्या घरीही कोरोनाचा शिरकाव, संसर्गानंतर धोनीचे आई-वडील रांचीतील रुग्णालयात दाखल