• Download App
    भारतातील 57 अब्जाधीशांकडे 69.3 लाख कोटींची संपत्ती; अदानींच्या संपत्तीत 5 लाख कोटींची घट|India's 57 billionaires have a wealth of 69.3 lakh crores; 5 lakh crores decline in Adani's assets

    भारतातील 57 अब्जाधीशांकडे 69.3 लाख कोटींची संपत्ती; अदानींच्या संपत्तीत 5 लाख कोटींची घट

    वृत्तसंस्था

    मुंबई : जागतिक आर्थिक संकट, महागाई आणि व्याजदरात सातत्याने होणारी वाढ यादरम्यान भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीत 133% वाढ झाली आहे. जगात फक्त भारताचा आर्थिक विकास मजबूत आहे. मंगळवारी जारी केलेल्या फॉर्च्युन इंडिया अहवालात देशातील 157 सर्वात श्रीमंत उद्योगपतींची सध्याची एकूण संपत्ती आणि गेल्या वर्षी म्हणजेच 2022च्या तुलनेत त्यात झालेली घट आणि वाढ यांचा तपशील दिला आहे. यादीत समाविष्ट या उद्योगपतींची एकूण संपत्ती 69.30 लाख कोटी रुपये आहे. एवढेच नाही तर देशातील 10 सर्वात श्रीमंत लोकांकडे एकूण संपत्तीपैकी 41.65% संपत्ती आहे.India’s 57 billionaires have a wealth of 69.3 lakh crores; 5 lakh crores decline in Adani’s assets



    लायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 8.19 लाख कोटी रुपये आहे, जी 2022च्या तुलनेत 9% जास्त आहे. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती 7.54 लाख कोटी रुपये होती. एका वर्षात सुमारे 65 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, संपत्ती वाढीबाबत सिम्पसन अँड कंपनीचे ए. कृष्णमूर्ती आणि जिरोधा ब्रोकिंगचे निखिल कामत शीर्षस्थानी आहेत. त्यांची संपत्ती एका वर्षात दुपटीने वाढली आहे.

    दुसरीकडे, मालमत्तेतील घटीचा विचार केला तर बायजू ग्रुपचे बायजू रवींद्रन हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती एका वर्षात 73.16% घसरून 10,980 कोटी रुपये झाली. त्याच वेळी, अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत एका वर्षात 49.17% ने घट झाली आहे. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती 10.3 लाख कोटी रुपये होती, ती आता 5.24 लाख कोटींवर आली आहे. मात्र, मालमत्तेत घट होऊनही अदानी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

    India’s 57 billionaires have a wealth of 69.3 lakh crores; 5 lakh crores decline in Adani’s assets

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!