प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिवाळीचा सण तोंडावर आला असताना देशातील लायटिंग मार्केट सजले आहे. 1000 कोटी रुपयांच्या या बाजारावर अनेक वर्षांपासून चीनचा जवळपास 100 % ताबा होता. मात्र, भारतीय ग्राहकांनी चीनची ही मक्तेदारी तोडण्यात यश मिळवले आहे. गलवान संघर्षानंतर ग्राहकांनी मेड इन इंडिया लायटिंगला पसंती दिली. त्यामुळे आता 30 ते 40 % स्वदेशी लायचटिंगची विक्री होत आहे. Indians attack China; Broken Monopoly in Diwali Lighting; 40 % lighting indigenous
त्यातही आता मोठ्या आणि मध्यम शहरांमध्ये प्रत्यक्ष बाजारात जाऊन आपल्याच व्यापाऱ्यांकडून खरेदी करा. ऑनलाईन मार्केटिंग करून खरेदी करून केवळ परदेशी कंपन्यांचा नफा करून देऊ नका, असा ट्रेंड सुरू झाल्याने त्याचाही परिणाम चिनी लाइटिंगच्या मक्तेदारीवर झाला आहे.
यंदा डिझायनर लायटिंगची मागणी अधिक आहे. दिवाळीत जाॅय लायटिंगचा व्यवसाय 80 ते 100 कोटी रुपयांचा होतो. यंदा स्वदेशी कंपन्यांनी दिवे, गणपती, स्वस्तिक इत्यादी डिझाइन बाजारात आणले आहेत. 50 हजार डीलर्स या व्यवसायात आहेत.
मोबाईल, लॅपटाॅप नियंत्रित लायटिंग
यंदा रंग बदलणारी व डीम होणारी लायटिंग तर बाजारात आहेच, पण रिमोट कंट्रोल तसेच मोबाईल व लॅपटाॅपवरुन नियंत्रित होणारी लायटिंगही आहे. मागच्या 5 वर्षांपासून वीज वाचवणारी लायटिंग उपलब्ध आहेत. त्यामुळे विजेचा वापरही कमी होतो.
23000 कोटींचा LED लायटिंग उद्योग
इलेक्ट्रिक लॅम्प अॅंड कंपोनेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, देशात एलईडीचा व्यवसाय 23 हजार कोटी रुपयांचा आहे. त्यात कंझ्युमर लायटिंगची हिस्सेदारी 60 % आहे.
Indians attack China; Broken Monopoly in Diwali Lighting; 40 % lighting indigenous
महत्वाच्या बातम्या
- नोकरीची संधी : हवामान विभागात 990 पदांसाठी भरती; अर्जासाठी आज शेवटची संधी
- अंधेरी पोटनिवडणूक : भाजपच्या माघारीसाठी काहींची मागच्या दराने विनंती, फडणवीसांचा गौप्यस्फोट!; विनंती नव्हे, सूचना होती पवारांचा खुलासा
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; महागाई भत्त्यापाठोपाठ प्रवास भत्ता आणि श्रेणीही वाढणार
- मोदी सरकारची दिवाळी भेट : आज पीएम किसान सन्मान निधीचे 16000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा!!
- संभाजीनगर + नाशिकच्या कंपन्यांमधील 1060 जागांसाठी आजपासून रोजगार मेळावा; व्हा