• Download App
    भारताला मिळणार ‘मॉडर्ना’चे ७५ लाख डोस, लस कधी येणार याची शाश्वती नाही Indian will get 75 lack moderna dose

    भारताला मिळणार ‘मॉडर्ना’चे ७५ लाख डोस, लस कधी येणार याची शाश्वती नाही

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधक लस विकसित करणारी अमेरिकेची कंपनी मॉडर्नाने भारताला लशीचे ७५ लाख डोस देण्याची तयारी दाखविली आहे. कोव्हॅक्स जागतिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत मॉडर्नाची लस भारतात येणार आहे. नुकसान भरपाईचा कलमाच्या कलमावर एकमत होत नसल्याने लस भारतात कधी येणार हे स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. Indian will get 75 lack moderna dose

    भारतात मॉडर्नाची लस उपलब्ध व्हावी, यासाठी अमेरिकी कंपनीबरोबर चर्चा सुरू असल्याचे सरकारने गेल्या आठवड्यात सांगितले होते. मॉडर्नाच्या लशीच्या तातडीच्या वापरासाठी भारताच्या औषध नियामक संस्थेने गेल्या महिन्यात परवानगी दिली होती.

    मॉडर्नाची लस देशात कधी उपलब्ध होऊ शकेल, याबद्दल माहिती देताना नीती आयोगाचे (आरोग्य) सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हणाले होते की, ही लस आयात करून भारतात उपलब्ध करण्याबाबत कंपनीबरोबर चर्चा सुरू आहे. कंपनीबरोबर करण्यात येणाऱ्या करारात नुकसान भरपाईच्या कलमाचा समावेश करण्यासबंधी भारत सरकारने काही अटी घातल्या आहे.

    Indian will get 75 lack moderna dose

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!