वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय गव्हाला जागतिक बाजारपेठेत नन्नाचा पाढा सुरूच आहे. आता आफ्रिकन देश इजिप्तने तब्बल 55,000 टन भारतीय गव्हाला विकत घेण्यास नकार दिला आहे. मुळात हा गहू तुर्कीला जाणार होता. Indian Wheat Export After Turkey Now Egypt Returns Indian Wheat
रॉयटर्सने इजिप्तचे प्लांट क्वारंटाइन चीफ अहमद अल अत्तार यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 55,000 टन गहू घेऊन जाणाऱ्या जहाजाला इजिप्तमध्ये प्रवेश करण्यापूर्वी नकार देण्यात आला होता. त्याच वेळी तुर्कीच्या प्रशासनाने यापूर्वीच या जहाजाच्या येण्यावर बंदी घातली आहे.
तुर्कस्तानने ‘सडलेला’ म्हणून परत पाठवला
भारतीय गव्हात रुबेला विषाणू आढळून आल्याच्या तक्रारीमुळे तुर्कीने ही खेप स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर तो इजिप्तला पाठवण्यात आला. मात्र, तुर्कस्तानला पाठवलेल्या गव्हाची खेप भारतातून थेट निर्यात केली जात नव्हती. भारतीय कंपनी ITC लिमिटेडने नेदरलँड स्थित कंपनीला हा विकला होता. त्यानंतर तो तुर्कीला पोहोचला.
नंतर बातमी आली की ही खेप इजिप्शियन व्यापाऱ्याने विकत घेतली आहे आणि जहाज आता गहू घेऊन या आफ्रिकन देशात रवाना झाले आहे. आता इजिप्तनेही या गव्हाला ‘नो एंट्री’चा बोर्ड दाखवल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
भारत मंजुरीची वाट पाहणार
एका वेगळ्या बातमीत, भारत सरकारने दुजोरा दिला आहे की ते इजिप्तला गहू निर्यात करण्यासाठी कस्टम क्लिअरन्सची प्रतीक्षा करणार आहे. तत्पूर्वी, तुर्कीचा गहू परतल्यावर अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी गुरुवारी सांगितले की, भारतातून गव्हाची खेप पाठवण्यापूर्वी क्वारंटाइन आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या होत्या. गव्हाची खेप घेण्यास नकार देण्याबाबत अद्याप तुर्की अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली नाही, असेही ते म्हणाले होते.
इजिप्त हा जगातील सर्वात मोठा गहू आयातदार देश
इजिप्त हा जगातील सर्वात मोठा गहू आयात करणारा देश आहे. मे महिन्यातच इजिप्तचे अन्न पुरवठा मंत्री अली मोसेल्ही यांनी थेट भारताकडून 5 लाख टन गहू खरेदी करण्याचा करार केला होता. हा करार सामान्य निविदा प्रक्रियेपेक्षा वेगळा असणार होता, परंतु त्यावर अद्याप स्वाक्षरी झालेली नाही. यापूर्वी एप्रिलमध्ये इजिप्तच्या कृषी मंत्रालयाने भारतातून गहू आयात करण्यास परवानगी दिली होती.
रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात गव्हाची मागणी आणि पुरवठा यातील तफावत वाढली आहे. त्याचा परिणाम इजिप्तवरही झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात EU गव्हाची किंमत 43 रुपये प्रति किलो आहे, तर भारतीय गहू 26 रुपये किलो दराने विकला जात आहे. दोघांमधील किमतीत 17 रुपये प्रति किलोचा फरक आहे.
भारताची गव्हाच्या निर्यातीवर बंदी
अलीकडेच, 13 मे रोजी भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यापूर्वी, भारताने तुर्कीला 56,000 टन गव्हाची खेप मंजूर केली होती. त्याचवेळी इजिप्तचे अन्न मंत्री अली मोसेल्ही यांनीही स्पष्ट केले होते की, भारत आणि इजिप्तमधील करारावर या बंदीमुळे कोणताही परिणाम होणार नाही, कारण या बंदीमुळे दोन्ही देशांमधील आयात-निर्यातीवर कोणताही परिणाम करत नाहीत.
Indian Wheat Export After Turkey Now Egypt Returns Indian Wheat
महत्वाच्या बातम्या
- MPSC नोकरीची संधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1085 रिक्त जागांसाठी भरती
- पोस्टात नोकरीची संधी : महाराष्ट्रात 3026 पदांची भरती; आज 5 जून अर्जासाठी शेवटचा दिवस!!
- ही तो श्रींची इच्छा ते बाळासाहेबांची इच्छा!!
- सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांना हवाय राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री; तर सुनील तटकरे म्हणतात देवेंद्र फडणवीस उत्तम!!