• Download App
    युक्रेन सोडावा लागलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रशियातून शिक्षण पूर्ण करण्याची ऑफर Indian students who had to leave Ukraine offered to complete their education in Russia

    युक्रेन सोडावा लागलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रशियातून शिक्षण पूर्ण करण्याची ऑफर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियामध्ये सुमारे आठ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या दोन्ही देशांमधील संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले. आता या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना रशियाने ऑफर दिली आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. Indian students who had to leave Ukraine offered to complete their education in Russia

    दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जातात. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथील भारतीय विद्यार्थ्यांना मायेदशी आणण्यात आले. युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत असेलेले हजारो विद्यार्थी भारतात सुखरुप परतले पण त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. आता रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ऑफर दिली आहे.

    दोन्ही देशांमधला वैद्यकीय अभ्यासक्रम सारखाच

    रशियन काॅन्सुल जनरल आयोग अवदीव चेन्नईमध्ये आले होते. यावेळी त्यांना सांगितले की, युक्रेन सोडणारे भारतीय विद्यार्थी रशियामध्ये त्यांचे शिक्षण पुन्हा सुरू करू शकतात. कारण दोन्ही देशांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम सारखाच आहे. तसेच, भारतीय विद्यार्थ्यांना रशियन भाषा समजणे देखील सोपे जाईल. कारण युक्रेनमधील बहुसंख्य लोक रशियन भाषिक आहेत. तिथली भाषा विद्यार्थ्यांना समजते तर रशियातली भाषा ही समजणे अवघड नाही, असे राजदूत अवदीव त्यांनी स्पष्ट केले

    Indian students who had to leave Ukraine offered to complete their education in Russia

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nepal : नेपाळमध्ये भूस्खलनामुळे दोन दिवसांत 51 जणांचा मृत्यू; 9 जण बेपत्ता; लष्कराच्या हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू

    Diwali : दिवाळी-छठदरम्यान विमान भाडे वाढवणाऱ्यांवर कडक कारवाई; 1700 अतिरिक्त उड्डाणे असतील

    सनातनचा अपमान; सरन्यायाधीश भूषण गवईंवर वयोवृद्ध वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न; शरद पवारांकडून पहिला निषेध