Indian Railway : रेल्वे स्टेशन किंवा ट्रेनमध्ये मास्क न घालता पकडल्यास तुमच्या खिशाला त्याची झळ बसणार आहे. भारतीय रेल्वेने रेल्वेच्या परिसरात आणि रेल्वेत मास्क न लावता प्रवास केल्याबद्दल 500 रुपयांपर्यंत दंडाची घोषणा केली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. Indian Railway to fine 500 rupees for travel without masks
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रेल्वे स्टेशन किंवा ट्रेनमध्ये मास्क न घालता पकडल्यास तुमच्या खिशाला त्याची झळ बसणार आहे. भारतीय रेल्वेने रेल्वेच्या परिसरात आणि रेल्वेत मास्क न लावता प्रवास केल्याबद्दल 500 रुपयांपर्यंत दंडाची घोषणा केली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.
रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या परिसरात मास्क घालणे रेल्वे कायद्याच्या अंतर्गत गुन्ह्याच्या कक्षेत आणले आहे. हा आदेश 6 महिन्यांपर्यंत कायम राहणार असल्याचे रेल्वेने घोषित केले. म्हणजेच पुढील 6 महिन्यांसाठी रेल्वे स्थानक आणि रेल्वेत मास्क घालणे अनिवार्य केले आहे.
यापूर्वी 11 मे 2020 रोजी रेल्वे मंत्रालयाने एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जारी केली आणि लोकांना रेल्वे स्थानकात प्रवेश करताना तसेच संपूर्ण प्रवासादरम्यान मास्क घालण्याची सूचना दिली. रेल्वे मंत्रालयानेही रेल्वे परिसरात थुंकल्यासही दंड लावण्याचे सांगितले आहे. शनिवारी रेल्वेने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वेच्या आवारात मास्क न घालणे, थुंकल्यास कडक कारवाई केली जाईल. याची अंमलबजावणीही काटेकोरपणे राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Indian Railway to fine 500 rupees for travel without masks
महत्त्वाच्या बातम्या
- Maharashtra Curfew 2021 : चिंता वाढली! महाराष्ट्रात रुग्णसंख्येचा नवा उच्चांक, २४ तासांत ६७,१२३ नवे रुग्ण, ४१९ रुग्णांचा मृत्यू
- UPI Transactions : 50 रुपयांखालील UPI व्यवहारांना चाप, लवकरच बदलणार आहेत नियम
- केंद्राचा मोठा दिलासा, अनेक औषधांच्या किमती केल्या कमी, रेमडेसिव्हिरही 1900 रुपयांनी स्वस्त, येथे पाहा यादी
- पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत रात्री 8 वाजता बैठक; कोरोना संसर्ग, लसीकरणासह या मुद्द्यांवरही होऊ शकते चर्चा
- Twitter Down Globally : जगभरात ट्विटर ठप्प, युजर्सना ट्वीट करायला येतेय अडचण, लॉगआऊटचा येतोय मेसेज