विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पासपोर्टही शक्तीशाली होऊ शकतो. होय, ज्या देशााचा पासपोर्ट असल्यावर दुसऱ्या देशांमध्ये व्हिसाची गरज भासत नाही तो पासपोर्ट शक्तीशाली मानला जातो. गेल्या वर्षभरात भारतीय पासपोर्ट अधिक सशक्त झाला असून आता ६० देशांत भारतीय व्हिसा घेतल्याशिवाय प्रवेश करू शकतात.Indian passport has become more powerful, now visa-free entry into 60 countries
हेन्ली पासपोर्ट इंडेक्सच्या आकडेवारीनुसार भारतीय पासपोर्ट गेल्या वर्षी जगातील 83 वा सर्वात शक्तिशाली दस्तऐवज बनला आहे. 2020 मध्ये 90 व्या क्रमांकावर होता. त्यावेळी भारतीय ५८ देशांत व्हिसाशिवाय प्रवास करू शकत होते.
जपान आणि सिंगापूर या अशियातील दोन देशांतील पासपोर्ट जगात पहिल्या क्रमांकावर आहे. या देशाचे नागरिक १८२ देशांत व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. जर्मनी आणि दक्षिण कोरिया या रँकिंगमध्ये संयुक्तपणे दुसºया स्थानावर आहेत.
या देशातील पासपोर्ट धारक 190 देशांत व्हिसामुक्त प्रवेश करू शकतात. फिनलंड, इटली, लक्झेंबर्ग आणि स्पेन 189 गुणांसह तिसºया स्थानावर आहेत. अफगाणिस्तान अपेक्षेपअमाणे या यादीमध्ये सर्वात तळाशी म्हणजे 166 व्या क्रमांकावर आहे.
Indian passport has become more powerful, now visa-free entry into 60 countries
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : सिद्धरामेश्वरांच्या पालखीवर मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचा पुढाकार
- लष्करप्रमुख एमएम नरवणे म्हणाले – चीनने युद्ध लादण्याचा प्रयत्न केल्यास भारत जिंकणार, एलएसीवरील वाद शांततेने सोडवण्याचे प्रयत्न
- ST Strike : कारणे दाखवा नोटीस मिळाल्याने जळगावमधील एसटी कर्मचाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन