• Download App
    भारतीय नौदलाने वाचविले इस्त्रायलच्या प्रवासी विमानातील २७६ प्रवाशांचे प्राण, आपत्कालीन लॅँडींगसाठी केले सहकार्य|Indian navy rescues 276 passengers on Israeli passenger plane, assists emergency landing

    भारतीय नौदलाने वाचविले इस्त्रायलच्या प्रवासी विमानातील २७६ प्रवाशांचे प्राण, आपत्कालीन लॅँडींगसाठी केले सहकार्य

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय नौदलाने इस्रायलच्या प्रवासी विमानातील २७६ नागरिकांचे प्राण वाचवून मोठी कामगिरी केली आहे. त्या विमानाचे एक इंजिन अचानक बंद करावे लागल्याने तत्काळ गोव्यातील दाभोळी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्यासाठी नौदलाने सहकार्य खूप मोलाचे ठरले. काही क्षणांचाही विलंब झाला असता तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती.Indian navy rescues 276 passengers on Israeli passenger plane, assists emergency landing

    ही घटना १ नोव्हेंबरला घडली होती. इस्रायलचे विमान बँकॉकहून तेल अवीव येथे जात होते. अचानक इंधन गळती झाल्याचा इंडिकेटर सुरू झाला. वैमानिकाने धोका लक्षात घेऊन एक इंजिन बंद करून, जवळच्या विमानतळावर आपत्कालीन लॅँडिंगची परवानगी मागितली.



    विमान त्यावेळी भारतीय नौदलाद्वारे संचालित हवाई हद्दीत होते. वैमानिकाने सविस्तर माहिती दिल्यानंतर नौदलाने तात्काळ कारवाई करून विमान दाभोळी विमानतळावर उतरविण्यात आले.गोवा विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी सांगितले की, विमानाला उतरविल्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाने तेल अवीव येथे पाठविण्यात आले.

    ती आपत्कालीन परिस्थिती नौदलाने व्यवस्थित हाताळली. नौदलाने त्वरित वैमानिकाला पुढील सूचना दिल्या. त्यासाठी विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी समन्वय साधला. त्यामुळे २७६ प्रवासी सुखरूप गोव्यात उतरू शकले.

    तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक समस्या, प्रवाशाच्या प्रकृतीत मोठा बिघाड, प्रकृती वा अन्य इतर आपत्कालीन परिस्थितीत वैमानिक जवळच्या विमानतळाला त्याची माहिती देतो. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य पाहून आपत्कालीन विमानाच्या लँडिंगचा निर्णय घेण्यात येतो.

    Indian navy rescues 276 passengers on Israeli passenger plane, assists emergency landing

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित