• Download App
    Kho-Kho World Cup भारतीय पुरुष संघाने पहिला खो-खो विश्वचषक जिंकला

    Kho-Kho World Cup भारतीय पुरुष संघाने पहिला खो-खो विश्वचषक जिंकला

    नेपाळचा ५४-३६ असा पराभव केला.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय पुरुष संघाने रविवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या खो खो विश्वचषक २०२५ चे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात टीम इंडियाने नेपाळचा ५४-३६ असा पराभव केला. यापूर्वी भारतीय महिला संघानेही नेपाळला हरवून विजेतेपद पटकावले होते.

    कर्णधार प्रतीक वायकर आणि स्पर्धेतील स्टार खेळाडू रामजी कश्यप यांच्या चमकदार कामगिरीमुळे, भारतीय पुरुष संघाने नेपाळविरुद्ध खेळलेला अंतिम सामना ५४-३६ असा जिंकला. यापूर्वी, भारतीय महिला संघाने खो खो विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेपाळला पराभूत केले होते. महिला संघाने नेपाळला ७८-४० असा पराभव केला.

    टीम इंडियाचा चॅम्पियनशिपपर्यंतचा प्रवास शानदार होता. संपूर्ण स्पर्धेत भारताने वर्चस्व गाजवले, सुरुवातीच्या काळात गट टप्प्यात ब्राझील, पेरू आणि भूतानवर विजय मिळवला. त्यांचा हा वेग बाद फेरीपर्यंत कायम राहिला, जिथे त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशला आणि उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हरवले.

    खो खो विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पंकज मित्तल आणि संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू हे देखील उपस्थित होते.

    याशिवाय ओडिशाचे क्रीडा आणि युवा सेवा आणि उच्च शिक्षण मंत्री सूर्यवंशी सूरज, आंतरराष्ट्रीय खो-खो फेडरेशनचे अध्यक्ष सुधांशू मित्तल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरचिटणीस कृष्ण गोपाल हे देखील उपस्थित होते.

    Indian mens team wins first Kho-Kho World Cup

    हत्वाच्या बातम्या

    Related posts

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??

    Indian Army पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरच भारताने सध्या थांबविले फायरिंग; भारतीय सैन्य दलांचा स्पष्ट खुलासा; शस्त्रसंधी शब्द नाही वापरला!!

    Operation sindoor : भारत – पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, पण फक्त फायरिंग थांबवल्याचा भारताचा खुलासा!!