• Download App
    अमेरिकेने ए-१ बी व्हिसावरील कडक निर्बंध हटविल्याने भारतीय आयटी उद्योगाला दिलासा|Indian IT industry relieved by US lifting of strict restrictions on H-1B visas

    अमेरिकेने ए-१ बी व्हिसावरील कडक निर्बंध हटविल्याने भारतीय आयटी उद्योगाला दिलासा

    अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळात एच – १ बी व्हिसावरील कडक निर्बंध हटविल्याने भारतीय आयटी उद्योगाला दिलासा मिळाला आहे. ट्रंप सरकारने घातलेल्या कडक निर्बंधांना न्यायालयाने नाकारल्याने हे नियम लागू करण्यात आले नव्हते.Indian IT industry relieved by US lifting of strict restrictions on H-1B visas


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळात एच – १ बी व्हिसावरील कडक निर्बंध हटविल्याने भारतीय आयटी उद्योगाला दिलासा मिळाला आहे. ट्रंप सरकारने घातलेल्या कडक निर्बंधांना न्यायालयाने नाकारल्याने हे नियम लागू करण्यात आले नव्हते.

    स्पेशालिटी आक्युपेशन याची व्याख्या करण्यावरून ट्रंप सरकारने अमेरिकेत परकीय नागरिकांना नोकरी करण्यास अनेक निर्बंध घालण्याचे ठरविले होते. मात्र, न्यायालयाने हे नियम फेटाळून लावले होते.



    त्यामुळे आता अमेरिकेच्या गृह विभागाने हा कायदा रद्द केला आहे. त्यामुळे बाहेरील देशातून प्लेसमेंट करताना एच-१ बी व्हिसा मिळणे सोपे होणार आहे.

    अमेरिकेच्या यूएस सिटीझनशिप इमीग्रेशन सर्व्हीसेस या अधिकृत स्थलांतर यंत्रणेच्या वतीने सांगण्यात आले की, गृह विभागाने ऑक्टोबर २०२० मध्ये ट्रंप सरकारने केलेला कायदा रद्द केला आहे. वास्तविक हा कायदा डिसेंबर २०२० मध्येच न्यायालयाने रद्द केला होता.

    त्यामुळे आता थर्ड पार्टी वर्कसाईट, एप्लॉयर- एम्लॉयी रिलेशनािप आणि स्पेशालिटक्ष आॅक्युपेशन यांच्यामध्ये आता बदल करण्याचे निश्चित केले आहे.त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता आणि एच-२ बी व्हिसा मिळविण्यासाठी आणखी सवलती दिल्या जाणार आहे. त्यामुळे अमेरिकेत एच- १ बी व्हिसा मिळणे सोपे होणार आहे.

    एच -१ बी व्हिसाद्वारे अमेरिकन कंपन्या स्पेशालिटी आक्युपेशनअंतर्गत परदेशी कर्मचाºयांना नियुक्त करू शकते. तार्किक किंवा तांत्रिक ज्ञान असलेले कर्मचारी याद्वारे नोकरीस ठेवता येऊ शकतात.

    अमेरिकेतील टेक कंपन्या दरवर्षी भारत आणि चीनसारख्या देशातून हजारो कर्मचाºयांना नियुक्त करतात. अमेरिकेत दरवर्षी ८५ हजाराहनू अधिक एच-२ बी व्हिसा जारी केले जातात.

    त्यातील ७० टक्के भारतीय असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत निर्बंध कडक केल्याने भारतीय कंपन्यांकडून अमेरिकेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

    Indian IT industry relieved by US lifting of strict restrictions on H-1B visas

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक