• Download App
    निवडणूक आयोगाने सांगितला आकडा 64.20 लाख; भारतीय मतदारांनी घातला जागतिक विक्रमाला हात!! Indian elections are indeed miracl, created world record of 642 million voters

    निवडणूक आयोगाने सांगितला आकडा 64.20 लाख; भारतीय मतदारांनी घातला जागतिक विक्रमाला हात!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीचा उत्सव 2024 च्या लोकसभा निवडणुकीतले मतदान पार पडले. एक्झिट पोलचे आकडेही बाहेर आले, उद्या प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे. पण त्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राजधानीत पत्रकार परिषद घेऊन भारतीय मतदारांनी जागतिक विक्रमाला हात घातले, असे सांगितले. देशात तब्बल 64 कोटी 20 लाख (642 मिलियन) मतदारांनी मतदान केल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. यामध्ये 31 कोटी 20 लाख महिला मतदारांचा समावेश होता. या सर्व महिला मतदारांना आपण उभे राहून सलामी दिली पाहिजे, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी आवर्जून सांगितले. Indian elections are indeed miracl, created world record of 642 million voters

    भारताने मतदानाचा जागतिक विक्रम नोंदवताना ज्या 64 कोटी 20 लाख मतदारांनी मतदान केले. ते विकसित G7 गटाच्या सदस्य देशांच्या एकूण मतदारांच्या 1.5 पट ठरले, तर EU अर्थात युरोपियन युनियन च्या 27 सदस्य रेषांच्या 2.5 पट ठरले.

    देशाच्या प्रचंड निवडणूक कारभारा संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांनी सविस्तर माहिती दिली. निवडणूक आयोगावरचे सगळे आक्षेप त्यांनी पुराव्यांसह खोडून काढले. जगात कुठल्याही लोकशाहीमध्ये 64 कोटी 2 लाख मतदारांनी मतदान केलेले नाही. ते भारतीय मतदारांनी करून दाखवले त्यांनी जागतिक विक्रमाला हात घातला भारतातल्या 2024 पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये देखील एवढे मतदान झाले नव्हते, याकडे मुख्य निवडणूक आयुक्तांनी आवर्जून लक्ष वेधले.

    सर्वसाधारणपणे निवडणूक आयोग मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत असतो परंतु ही प्रथा तोडून निवडणूक आयोगाने मतमोजणी पूर्वी एक दिवस आधी पत्रकार परिषद घेतली. “मिसिंग जेंटलमेन” अशी कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामध्ये निवडणूक आयोगाचे अस्तित्वच या निवडणुकीत दिसले नाही, असा दावा केला गेला. या दाव्याला मुख्य निवडणूक आयुक्तांनी पुराव्यांसकट उत्तर दिले. निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या उत्सवातला लोक सहभाग कसा वाढविला??, किती लोकांनी त्यामुळे सहभाग घेतला?? निवडणूक कशाप्रकारे शांततेत झाली?? यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये कसे गैरप्रकार व्हायचे ते गैरप्रकार या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने किती कठोर पावले उचलून टाळले??, याचे सविस्तर वर्णन मुख्य निवडणूक आयुक्तांनी केले.

    सुरत आणि इंदूरमध्ये सर्वच उमेदवारांनी माघार घेतले. त्यानंतर त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक बिनविरोध निवडणूक झाली. परंतु त्यानंतर नोटा आणि उमेदवार यांच्यात लढत झाली पाहिजे होती, असा मतप्रवाह सुरु झाला. त्यावर निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिले. निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, आमची धारणा आहे सर्वच ठिकाणी मतदान झाले पाहिजे. परंतु निवडणुकी दरम्यान उमदेवारी अर्ज माघारीपर्यंत उमेदवार माघार घेत असेल तर आम्ही काय करु शकतो? कोणावर दबाब असेल तर आम्ही काही भूमिका घेऊ शकतो. परंतु ते स्वता:च्या इच्छेने माघार घेत असतील तर आम्ही काहीच करु शकत नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.

    मतदानाचा जागतिक विक्रम

    लोकसभा निवडणूक निकालापूर्वी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. मंगळवारी 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी या निवडणुकीत जागतिक विक्रम झाल्याचे सांगितले. जगात प्रथमच 64 कोटी 2 लाख लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. जगभरातील कोणत्याही देशात इतक्या विक्रमी संख्येने मतदान झाले नाही. देशातील 31 कोटी 20 लाख महिला मतदारांनी मतदान केले. देशातील ज्येष्ठ नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने मतदान केले.

    देशात कुठेही हिंसाचार नाही…

    देशातील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यरत होती. 135 स्पेशल ट्रेन सातत्याने निवडणूक यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांना नेण्याचे आणि आणण्याचे काम करत होते. या निवडणुकीत देशात कुठेही हिंसा झाली नाही. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरु होते. मणिपूर, काश्मीर यासारख्या ठिकाणी शांततेत मतदान झाले. काश्मीरमध्ये  51.05 % मतदान झाले. आता जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे.

    निवडणूक आयोगाचे महत्वाचे मुद्दे

    • 10000 कोटींची कॅश जप्त केली. निवडणुकीत कुठेही पैसे वाटप किंवा वस्तू वाटप होऊ दिले नाही
    • निवडणुकी दरम्यान केंद्रीय मंत्री असो की राज्याचे मंत्री सर्वांच्या हेलिकॉप्टरची, वाहनांची कसून तपासणी केली.
    • राजकीय नेत्यांचे जितके नातेवाईक उच्च पदावर होते, त्यांना निवडणूक काम दिले गेले नाही.
    • वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या शिष्टमंडळांनी निवडणूक आयोगाच्या भेटी घेऊन काही विशिष्ट मागण्या केल्या. त्या मतमोजणी संदर्भातल्या सगळ्या मागण्या निवडणूक आयोगाने मान्य केल्या आहेत. मतमोजणीची सगळी प्रक्रिया सीसीटीव्ही लावूनच होईल
    • प्रत्येक उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांना संपूर्ण विश्वासात घेऊन मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाईल.
    • उमेदवार अथवा निवडणूक प्रतिनिधी अथवा राजकीय पक्ष यांनी मतमोजणीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यास कायदेशीर चौकटीतून त्यांचे समाधान केले जाईल.

    Indian elections are indeed miracl, created world record of 642 million voters

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य