• Download App
    भारतीय अर्थव्यवस्था २०२२ मध्ये वृध्दीदरात चीन, अमेरिकेलाही मागे टाकणार, २०२२-२३ मध्ये घेणार आणखी उसळी|Indian economy to surpass China, US in 2022 growth, to pick up further in 2022-23

    भारतीय अर्थव्यवस्था २०२२ मध्ये वृध्दीदरात चीन, अमेरिकेलाही मागे टाकणार, २०२२-२३ मध्ये घेणार आणखी उसळी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वेगाचा अंदाज थोडासा कमी केला असला तरी वृध्दीदरात भारत चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार असल्याचे म्हटले अहे. भारतीय अर्थव्यवस्था २०२२-२३ मध्ये उसळी घेणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तविला आहे.Indian economy to surpass China, US in 2022 growth, to pick up further in 2022-23

    वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूकच्या मंगळवारी जारी करण्यात आलेल्या अहवालात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्थिक वर्ष २०२१-२२ साठीचा भारताचा वृद्धीदर अंदाज घटवून ९.५ टक्के केला आहे. एप्रिलमध्ये तो नाणेनिधीने १२.५ टक्के अनुमानित केला होता. मात्र, तरीही इतर मोठ्या अर्थव्यवस्थांपेक्षा हा वृध्दीदर जास्त असणार आहे.



    आर्थिक वर्ष २०२२ साठी भारताचे वृद्धीदर भवितव्य इतर मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेने जास्त राहणार आहे. भारताचा वृद्धीदर अंदाज ९.५ टक्के अनुमानित करण्यात आलेला असताना चीनचा वृद्धीदर ८.१ टक्के, तर अमेरिकेचा वृद्धीदर ७ टक्के अनुमानित करण्यात आला आहे. २०२२-२३ साठी भारताचा वृद्धीदर अंदाज नाणेनिधीने वाढवून ८.५ टक्के केला आहे. एप्रिलच्या अहवालात तो ६.९ टक्के अनुमानित करण्यात आला होता.

    कोविड-१९ साथीच्या पहिल्या लाटेनंतर भारतीय अर्थव्यवस्था चांगली सुधारत होती. तथापि, दुसऱ्या लाटेनंतर सुधारणेला मोठी खीळ बसली आहे, असे नाणेनिधीने म्हटले आहे अहवालात म्हटले आहे की, मार्च-मे या कालावधीत आलेल्या दुसºया कोविड लाटेमुळे भारतातील आर्थिक पुनरुज्जीवन प्रक्रियेस जबर धक्का बसला आहे. त्यामुळे वृद्धीदर अंदाज घटविण्यात आला आहे.

    भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतचा नारा दिला होता. त्याचबरोबर २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. लघू, मध्यम आणि मोठ्या उद्योगांसाठी पतहमी देण्यात आली होती.

    त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने कोरोनामुळे लॉकडाऊनच्या नियमावलीत बदले केले. अर्थव्यवस्थेचे चक्र सुरळित राहावे यासाठी उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली. त्याचबरोबर शेतीसाठी अनेक पॅकेज दिली. त्यामुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ झटकून गेली आहे.

    Indian economy to surpass China, US in 2022 growth, to pick up further in 2022-23

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!